शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत चार हजार बालकामगारांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:42 IST

पोलिसांची आकडेवारी : तुटपुंजा पगारात घेतले जाते राबवून; दोन हजार मालकांना कोठडीची हवा

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरीवर दिवसरात्र राबविणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने मालकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे बालमजुरीला चाप बसण्यास मदत होत असून, गेल्या ९ वर्षांत ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये जवळपास २ हजार मालकांना कोठडीची हवा खावी लागली आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह नेपाळमधून येणाºया बालमजुरांची संख्या अधिक असून, अवघ्या एक ते तीन हजार रुपयांसाठी ही मुले मुंबईत काम करतात. तुटपुंज्या पगारात त्यांना दिवसरात्र राबवून घेतले जाते.घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरीकाम, चामड्याचा व्यवसाय, प्लॅस्टिक, मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी पगारात, कमी खर्चात लहान मुलांकडून काम होत असल्यामुळे मालक बालमजुरांसाठी आग्रही असतात.

पोलीस वेळोवेळी अशा ठिकाणी धाडी टाकून बालमजुरांची सुटका करतात. त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली करतात. मात्र, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले काही काळ गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी काम करताना दिसतात. यावर उपाय म्हणून शहरात कोणत्या परिसरात जास्तीत जास्त बाजमजूर काम करतात त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्या-त्या परिसरात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने समाजसेवा शाखेने छापे टाकण्यास सुरुवात केली.

मुंबईतून गेल्या ९ वर्षात ४ हजारांहून अधिक बालमजुरांची सुटका करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये गेल्या वर्षी ३५८ बालमजुरांचा समावेश होता, तर १९४ मालकांना कोठडीची हवा खावी लागली. त्यामुळे कायद्यातील बदलांमुळे मालकांवर चाप बसत आहे.

कायद्यातील सुधारणेमुळे वचकमार्च २०१५ मध्ये बालमजूर विरोधी कायद्यात सुधारणा करत ३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून किमान सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बालमजूर ठेवण्याआधीच सावध व्हावे.

कामाच्या ठिकाणी अनेक गैरसोयीच्उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बालमजूर नोकरीच्या शोधार्थ मुंबईत येतात.च्आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ ते १५ वयोगटातील लहान मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांना अत्यल्प पगार दिला जातो.च्मालक या लहान मुलांची एका खोलीत किंवा उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करतो. मात्र राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेत अनेक गैरसोयी असल्याने या मुलांची हेळसांड होते.