शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले अंजनेरी

By admin | Updated: April 30, 2017 02:40 IST

किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना

- गौरव भांदिर्गे

अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान असलेला किल्ले अंजनेरीगडदर्शन :- किल्ला चढाईस २ तास लागतात. अंजनेरी गावातून जाताना उजव्या बाजूस आपणास तीन सुळके दिसतात. त्यातील मोठ्या सुळक्याला नवरदेव तर छोट्या दोन सुळक्यांना सासू आणि नवरी म्हणतात. गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने गावाला लागून असलेला डोंगर उजव्या हाताने वर चढून गेल्यावर आपण जीपगाडीच्या मार्गावर येतो. पुढे कच्च्या रस्त्याने साधारण अर्ध्या तासानंतर आपण आम्रवृक्षांशेजारी पोहोचतो. तेथून उजव्या हाताने पायऱ्यांच्या मार्गाने डोंगर चढाई करायची. साधारण १००-१२५ पायऱ्या, मध्येच सपाटी, पुन्हा पायऱ्या असे टप्पे पार केल्यावर आपण दोन कातळकड्यांमधील खिंडीच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून संपूर्ण मार्ग पायऱ्यांचा आहे.या पायऱ्यांनी जात असताना डाव्या बाजूस कातळात खोदलेली एक जैन गुंफा आहे. तिथून खिंडीतल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचायचे. सपाटीवर कोरडे टाके व भग्न तटबंदीचे अवशेष दिसतात, तसेच वर चढून गेल्यावर आपण हनुमान तळ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या सीतागुंफेत पोहोचतो. येथे काही शिल्पे, चौकटी प्रवेशद्वार, दगडी घडीव पायऱ्या, द्वारपालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. येथून गर्द झाडीतून बालेकिल्ल्यावर पोहोचायचे. ही वाट म्हणजे खडी चढाई आहे. शासनाने रेलिंग लावलेल्या आहेत. याच्या आधारे वर चढाई करावी व मधल्या टप्प्यावर डाव्या बाजूला जावे. आपणास एक कातळकोरीव गुंफा लागते. येथेच हनुमानाचा जन्म झाला, असे सांगितले जाते. पुन्हा रेलिंगकडे जावे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचतो. येथून १५ मि. चालून गेल्यावर आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. या मंदिरात अंजनीमातेची मूर्ती व तिच्या मांडीवर बसलेला हनुमान अशी मूर्ती आहे. मंदिरामागेच इतिहासकालीन इमारतींचे चौथरे आहेत. परतीसाठी आल्यावाटेने परत जावे. जाताना अंजनेरी गावात १२व्या शतकातील हिंदू व जैन मंदिरे आवर्जून पाहावीत व तेथून ४ कि.मी. अंतरावर असलेले जगातील सर्वांत मोठे नाणिसंग्रहालय पाहावे.किल्ल्यावर जाण्याच्या वाटानाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणारी बस पकडायची व २० कि.मी. अंतरावर असलेल्या अंजनेरी फाट्यावर उतरायचे. येथून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने चालू लागायचे. येथून अंजनेरी गावात पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो.इतिहासअंजनेरी किल्ल्याचा उल्लेख अगदी राष्ट्रकुट काळापासून मिळतो. हा परिसर चालुक्यांच्या अंमलाखाली होता. त्या वेळी अंजनेरी गाव त्र्यंबकेश्वरहून मोठे होते. दीड हजार वर्षांपूर्वी गवळी राजाची राजधानी होती. शिवकालात आॅक्टोबर १६७०मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून घेतला, त्याच वेळी अंजनेरीसुद्धा स्वराज्यात आला. पुढे १७५०मध्ये निजामाच्या ताब्यात गेला. पुढे पेशवे काळात राघोबादादा पेशवे यांनी किल्ल्यावर विश्रांतीसाठी एक वाडा बांधला होता. नंतर इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.