शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी आजी-माजी पदाधिकारी भिडले

By admin | Updated: January 18, 2017 02:50 IST

पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत आपआपसात भिडल्याचे चित्र एस वॉर्डमध्ये पाहावयास मिळाले आहे.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- एरवी खांद्याला खांदा लावून फिरणारे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत आपआपसात भिडल्याचे चित्र एस वॉर्डमध्ये पाहावयास मिळाले आहे. यापैकी भांडुपच्या ११८ प्रभागामध्ये भाजपाचे चक्क ३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर ११३ मध्ये सेनेच्या ११ महिला पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एस वॉर्डमध्ये १४ प्रभागांपैकी ११ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत, तर मोजून तीन प्रभाग खुले झाले असल्याने सर्वांनीच या प्रभागात नशीब अजमावण्यासाठी उडी घेतली आहे. वर्षानुवर्षे पक्षाची सेवा केल्याने आपल्यालाही संधी मिळायला हवी या उद्देशाने प्रत्येक जण पुढे येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गतच आजी-माजी पदाधिकारी भिडल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे. भांडुपचा ११८ प्रभाग हा खुला असल्याने भाजपाचे ३५ इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत, तर ११५ मध्ये भाजपाचे १४ उमेदवार फिल्डिंग लावून आहेत. यामध्ये जिल्हा महामंत्री, माजी अध्यक्ष, महामंत्री, माजी तालुका अध्यक्ष, माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि आजी-माजी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.विक्रोळीचा ११३ हा प्रभाग महिलांसाठी खुला असल्याने सेनेच्या तब्बल ११ जणींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकाकडून वरिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर उमेदवारी दिली नाही तर पक्षत्याग करण्याचा पवित्रा काहींनी घेतला आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या बाजूने जायचे की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची या पेचात वरिष्ठ पडले आहेत.