शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा!

By admin | Updated: September 29, 2016 01:49 IST

सिंदखेड राजा तालुक्यातील घटनेत सहा लाखांचा ऐवज चोरट्यानी लंपास.

सिंदखेड राजा(जि. बुलडाणा), दि. २८- माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक, भीमगर्जना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन म्हस्के यांच्या घरावर आठ ते दहा जणांच्या सशस्त्रधारी दरोडेखोरांनी २८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हल्ला करून सहा लाखांचे सोने लुटून नेले. हल्लेखोरांनी बबन म्हस्के व त्यांच्या मुलालाही मारहाण करून जखमी केले. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळावर दाखल होऊन पाहणी केली. स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूला बबन म्हस्के यांचे निवासस्थान आहे. मंगळवारच्या रात्री घरात सर्वजण झोपले असताना बुधवारच्या सकाळी ३ वाजताच्या सुमारास ८ ते १0 दरडेखोरांनी हातात शस्त्र घेऊन आणि तोंडावर काळे कपडे बांधून, घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी बबन म्हस्के यांना जाग आली. त्यांनी घरातील महिलांना दुसर्‍या खोलीत सुरक्षित ठिकाणी पाठविले. तोपयर्ंत दरोडेखोरांनी आपल्या हातातील गुप्तीने म्हस्के यांच्यावर वार केला. मात्र, त्यांनी गुप्ती हातात पकडून, हल्लेखारोला अडविण्याचा प्रयत्न केला. तोपयर्ंत दुसर्‍या दरोडेखोराने बबन म्हस्के यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार केला. त्यामुळे ते रक्त बंबाळ झाले. त्याचवेळी त्यांची मुलगी पूजा हिने दरोडेखोराचा प्रतिकार करत त्यांच्या तोंडावरील रूमाल काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी तिच्या हातावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. दरोडेखोरांनी बबन म्हस्के यांच्या गळ्यातील एक १0 तोळय़ाची व दुसरी ८ तोळय़ाची चैन, असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरोडेखोरांचा पाठलाग करीत बबन म्हस्के महामार्गापयर्ंत आले. त्यांनतर बबन म्हस्के यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर साखरखेर्डा, किनगाव राजा, बीबी, देऊळगाव राजा येथील पोलिसांनी नाकाबंदी केली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वेंजने, समीर शेख आदींनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी आपल्या चमूसह तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बबन म्हस्के यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि तत्काळ दरोडेखोरांना अटक करण्याची मागणी केली.