शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदाराच्या अंगरक्षकाची हत्या

By admin | Updated: April 15, 2016 02:08 IST

छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात साध्या वेशात आलेल्या सुमारे सहा नक्षलवाद्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची गोळ््या घालून

अहेरी/आलापल्ली (गडचिरोली) : छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात साध्या वेशात आलेल्या सुमारे सहा नक्षलवाद्यांनी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची गोळ््या घालून हत्या केली. दुपारी दीड वाजता ही घटना घडली. नागोसे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार आदींसह अहेरी व आलापल्ली लोक उपस्थित होते. अ‍ॅड. उदयप्रकाश गलबले मार्गदर्शन करीत असताना मंचाच्या मागच्या बाजूला अचानक फटाके फोडल्यासारखा आवाज झाला. त्यामुळे लोक आवाजाच्या दिशेने गेले. तेव्हा सहा शस्त्रधारी नक्षलवादी हे पोलीस हवालदार नानाजी बारकुजी नागोसे (४५) यांच्यावर गोळीबार करताना त्यांना दिसले. त्यांच्यावर आठ गोळ््या झाडण्यात आल्या. घटनेच्या दहा मिनिटांपूर्वी नानाजी नागोसे हे मंचावर उपस्थित होते. ते मंचावरून बाजूला गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. नक्षलवादी नागोसे यांची रायफल व काडतूस घेऊन जंगलाच्या दिशेने पळून गेले. आत्राम यांनी रेपनपल्ली पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. नागोसे यांचे पार्थिव रेपनपल्ली येथून गडचिरोली पोलीस दलाच्या हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)