शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीकडून अटक

By admin | Updated: February 1, 2016 23:32 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने अटक केल्याचे पीटीयने वृत्त दिले आहे. दुपारी १ पासून समीर यांची इडीकडून चौकशी सुरु होती

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ - महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना इडीने अटक केल्याचे पीटीय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. आज दुपारी १ पासून समीर यांची इडीकडून चौकशी सुरु होती, ९ तासाच्या चौकशीनंतर त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे भुजबळ कुंटुंबीयांविरुद्ध कारवाईचा फास आवळ्लयाचे दिसते आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत.महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर आज सक्तवसुली संचालनालयाकडून पुन्हा छापे मारण्यात आले आहेत. छगन भुजबळ लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसतील अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या छाप्यांवर दिली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारण्यात आले आहेत.

सक्तवसुली संचालनालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, एक डझनपेक्षा जास्त अधिका-यांची टीम छाप्यांमध्ये सहभागी आहे. तसेच भुजबळांच्या फक्त मुंबईतल्याच मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत तपास संपवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भुजबळ यांच्या मालकीचा बांद्रे येथील एक मोकळा भूखंड व सांताक्रूझ येथील एक नऊ मजली इमारत या दोन्ही मालमत्तांवर टाच आणली होती. याआधी छगन भुजबळ यांनी आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप करत कायद्याच्या मार्गाने आपण लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.