माजलगाव/ बीड : राज्याचे माजी मंत्री सुंदरराव आबासाहेब सोळंके यांचे बुधवारी रात्री ९ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात माजी मंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके, चंद्रकांत हे तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.१९६७ मध्ये केज विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधरअप्पा बुरांडे यांना पराभूत करून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९७२ मध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातून ते बिनविरोध आमदार झाले. १९७८ मध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ते लढले होते. याच काळात ते वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात त्यांनी ३० वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
माजी मंत्री सुंदरराव सोळंके यांचे निधन
By admin | Updated: November 6, 2014 03:33 IST