शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

By admin | Updated: September 28, 2016 19:50 IST

मधुकरराव पिचड यांचे महादेव कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. के.एल.वडणे यांनी रद्द ठरविले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 28 - राज्याच्या जातीच्या यादीत समावेश नसलेले माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे महादेव कोळी जमातीचे वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे व न्या. के.एल.वडणे यांनी रद्द ठरविले .मात्र त्यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. महादेव कोळी जमातीच्या प्रमाणपत्राआधारे पिचड यांना मिळालेले लाभ त्यांच्याकडून काढून घेतले जाणार नाहीत, हे खंडपीठाने स्पष्ट केल्याने पिचड यांना दिलासा मिळाला आहे . आ. पिचड यांना संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयाने ९ आॅगस्ट १९९९ रोजी ह्यमहादेव कोळीह्ण जमातीचे प्रमाणपत्र दिले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना २२ जून २०११ रोजी वैधता प्रमाणपत्रही मिळाले. या प्रमाणपत्राला नागपूर येथील महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मित्रमंडळाने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. मंडळाचे भगवान विठूजी नन्नावरे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.याचिकेत पिचड यांच्यासह मुख्य सचिव, आदिवासी कल्याण विभागाचे अध्यक्ष, आदिवासी जात पडताळणी समितीचे (नाशिक) आयुक्त, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते. पिचड यांना दिलेल्या वैधता प्रमाणपत्रामुळे आदिवासी जमातीचे नुकसान झाले, त्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून वैधता प्रमाणपत्र मिळविले आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. वस्तुत: महादेव कोळी या जमातीचा राज्याच्या जातीच्या यादीत समावेश नाही, तर कोळी महादेव या जमातीचा समावेश राज्याच्या यादीत आहे. महादेव कोळी ही जात कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरली जात नाही. पिचड यांच्या जातीचे सर्व पुरावे फक्त कोळी जातीचे असताना समितीने त्यांना महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र दिले. त्यामुळे वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली. ही विनंती खंडपीठाने मान्य करताना पिचड यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नितीन मेश्राम व अ‍ॅड. सुशांत येरमवार तर शासनातर्फे ज्येष्ठ वकील व्ही. ए. गांगल आणि समितीतर्फे अ‍ॅड. प्रवीण पाटील यांनी बाजू मांडली.