शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

माजी आरोग्यमंत्र्यांचा ‘हॉर्वर्ड’कडून सन्मान

By admin | Updated: July 3, 2015 03:36 IST

हॉर्वर्ड हेल्थ मिनिस्ट्रियल फोरमच्या वतीने जगातील आरोग्यमंत्र्यांची चौथी परिषद बोस्टन येथे नुकतीच झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना

मुंबई : हॉर्वर्ड हेल्थ मिनिस्ट्रियल फोरमच्या वतीने जगातील आरोग्यमंत्र्यांची चौथी परिषद बोस्टन येथे नुकतीच झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना विशेष ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्या परिषदेने काय दिले, याविषयीचे सविस्तर पत्र ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून देणार आहेत.जगभरात आरोग्याच्या क्षेत्रात कोणते बदल होत आहेत, कोणते नवीन प्रयोग होत आहेत, औषधे खरेदी प्रक्रियेत काय बदल होत आहेत, ती पारदर्शक होण्याच्या दृष्टीने कोणती राज्ये, देश काय पावले उचलत आहेत, याविषयी विविध देशांच्या व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची परिषद बोस्टन येथे दरवर्षी आयोजित करण्यात येते. गेल्या वर्षी मार्डचे कामबंद आंदोलन आणि विधिमंडळ अधिवेशन यामुळे शेट्टी परिषदेस जाऊ शकले नव्हते.या वर्षी त्यांना पुन्हा या परिषदेचे निमंत्रण त्यांच्या व्यक्तिगत ईमेलवर आले. तेव्हा आता आपण आरोग्यमंत्री नाही, डॉ. दीपक सावंत हे आरोग्यमंत्री असून त्यांच्याशी संपर्क साधा, असा ईमेल शेट्टी यांनी पाठवला. मात्र याच्या उत्तरादाखल आलेल्या ईमेलमध्ये आपल्या ‘प्रॉक्युरेमेंट पॉलिसी’बद्दल आपणच येथे येऊन माहिती द्यावी, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शेट्टी हे परिषदेस उपस्थित राहिले.महाराष्ट्रात सुरेश शेट्टी यांनी केलेले काम माहीत असल्यामुळेच या परिषदेसाठी निमंत्रण देण्यात येत असल्याचे आयोजकांतर्फे सुरेश शेट्टी यांना कळविण्यात आले.या पाच दिवसीय परिषदेस केनडी स्कूल आॅफ गव्हर्नमेन्ट आणि हॉर्वर्ड स्कूल आॅफ हेल्थ, वर्ल्ड बँक आदींचे अधिकारी सहभागी होते. वरिष्ठ अधिकारी पूर्णिमा मेनन यांनी भारतातर्फे सादरीकरण केले तर शेट्टी यांनी महाराष्ट्राने आरोग्य विभागात केलेल्या सुधारणा सांगितल्या. त्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेपासून ब्लड आॅन कॉल, शिशुसुरक्षा योजनेपर्यंतची माहिती त्यांनी दिली.आरोग्य या विषयावर जगाचा विचार आणि आपण काय करत आहोत याचे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असेही शेट्टी यांनी सांगितले.