शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँकेचे माजी संचालक सहकारमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: October 24, 2016 18:55 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकांमार्फत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे अपील

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 24 - अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकांमार्फत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले आहे. प्रशासकांच्या कालावधित झालेल्या वसुलीच्या प्रक्रियेबाबत तसेच चौकशीच्या कायदेशीरपणाबद्दल याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रावरील सुनावणीचे कामकाज सुरू असून, सुनावणीच्या पाच तारखा झाल्या आहेत. दरम्यान, माजी संचालकांनी याप्रकरणी सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. याची तोंडी माहिती चौकशी अधिकाºयांना दिली असली तरी, सहकार विभागाकडून याप्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित झाली नाही. अपील दाखल करून घेण्यात आले असून, दिवाळीनंतर यासंदर्भातील सुनावणी होण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी सहकारमंत्र्यांकडूनही दाद न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही तयारी माजी संचालकांनी केली आहे. माजी संचालकांकडून दाखल झालेल्या अपिलामध्ये जी प्रकरणे कायदेशीर पातळीवर सक्षम आहेत, अशा प्रकरणांच्या वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर कर्जवसुलीची जबाबदारी प्रशासकांची होती. प्रशासकांनी ती जबाबदारी पार पाडलेली नसल्याने त्याचा भार संचालकांच्या अंगावर पडला आहे, असाही मुद्दा माजी संचालक उपस्थित करीत आहेत. अपिलांतर्गत होणाºया सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरलाघोटाळाप्रकरणी सोमवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर सुनावणीची प्रक्रिया पार पडली. माजी संचालक, अधिकाºयांच्या मागणीनुसार ९५ टक्के कागदांची पूर्तता करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात कागदपत्रांच्या प्रती संबंधितांना प्राप्त होणार आहेत. पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार असून, त्यादिवशी माजी संचालक, अधिकाºयांना म्हणणे मांडण्याची सूचना दिली आहे. म्हणणे मांडण्यासाठी आता आणखी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कागदपत्रे प्राप्त झालेल्या माजी संचालकांनी म्हणणे मांडण्याची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जबाबदारी निश्चितीच्या दृष्टीने चौकशी अधिका-यांकडून प्रयत्न केले जाण्याची चिन्हे आहेत.