शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे निधन

By admin | Updated: June 17, 2016 22:23 IST

राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 17 - राज्याचे माजी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांचे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी सूर्यकांत जोग यांनी १९८४ मध्ये राज्याचे पोलीस महासंचालक पद भूषविले. गेल्या काही दिवसांपासून ते आपले नातू कौस्तूभ यांच्याकडे उपचार घेत होते. मंत्रालयाशेजारील वसाहतीमधील कौस्तूभ जोग यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी मुंबई येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चिखलदऱ्यांमध्ये निवासी शाळा सुरू केली होती. याशिवाय सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. १९५३ मध्ये ते भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते. बुलढाण्यांमध्ये पोलीस अधीक्षकपद त्यांनी भूषविले. महाराष्ट्रामध्ये औरंगाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पहिली नियुक्ती मिळाली.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीमध्ये घेणाऱ्या सूर्यकांत जोग यांच्या पत्नीचे ३ आॅक्टोबर १९८६ ला निधन झाले. तत्पूर्वी १९८४ मध्ये त्यांच्या २३ वर्षीय मुलाचे विमान अपघातात तेजपूर येथे निधन झाले. मीग २१ला तो अपघात झाला होता. त्या धक्क्यातून सावरत असतानाच जोग यांच्या आयपीएस अधिकारी असलेल्या थोरल्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर ते कधी अमरावती तर कधी मुंबई मुक्कामी राहत होते.