शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी

By admin | Updated: October 16, 2014 05:14 IST

माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर शेट्टी यांना एक कोटीच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

ठाणे : माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर शेट्टी यांना एक कोटीच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले शेट्टी यांचा बांधकाम व्यवसाय आहे. ते हिरानंदानी येथे असताना १४ आॅक्टोबर २०१४ रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास एकाने त्यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि धमकावले. ‘तुझा ४०० ते ५०० कोटींचा प्रोजेक्ट आहे. तू मला एक करोड रुपये दे, नाहीतर तुझी विकेट घेईन,’ अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आले. त्यानंतर, पुन्हा याच व्यक्तीने फोन करून ‘एक करोड रुपयांचे काय झाले, नाहीतर दुसऱ्या व्यक्तीचा खून करून तुला त्या केसमध्ये अडकवीन’, अशी धमकी दिली. याप्रकरणी शेट्टी यांनी तातडीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले तेव्हाही त्यांना हा फोन आला होता. शेट्टी यांना कोणी फोन केला, याचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याही फोनचा तपशील पडताळण्यात येत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय गोळे यांनी दिली.