शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीटीएनएस’च्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सचे गठन

By admin | Updated: March 11, 2017 02:48 IST

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चमूवर जबाबदारी.

आशिष गावंडेअकोला, दि. १0- गुन्हा व गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी 'सीसीटीएनएस' प्रकल्पाच्या माध्यमातून 'मिशन मोड प्रोजेक्ट' देशभरात लागू करण्यात आला असतानाच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या गृह विभागाने टास्क फोर्स (कृती दल)चे गठन केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) व त्यांच्या चमूकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन प्रबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपण सादर करताना पोलीस यंत्रणेचा मोठय़ाप्रमाणात वेळ खर्ची होतो. काही गुन्ह्यांमध्ये वेळीच गुन्हा सिद्ध करणार्‍या पुराव्यांचा शोध अपूर्ण राहतो. त्याचा फायदा न्यायालयात आरोपींना मिळतो. याशिवाय मोबाइल, इंटरनेटच्या गैरवापरातून सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांची नोंद करून त्याचा माग काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. साहजिकच, सायबर गुन्हे करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्यासाठी ह्यसीसीटीएनएसह्ण(क्राइम अँन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँन्ड सिस्टम) हा प्रकल्प देशभरात लागू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व पोलीस ठाणी, परिक्षेत्र कार्यालये, पोलीस उपायुक्त-सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे व पोलीस महासंचालक कार्यालये यांच्यासह देशातील सर्व पोलीस ठाणी व इतर वरिष्ठ कार्यालयांशी जोडली जात आहेत. सीसीटीएनएसची प्रभावी अंमलबजावणी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कृती दल गठित करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्य अग्रेसरसीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत राज्याच्या पोलीस विभागाने विशेष प्रगती केली आहे. गुन्हे प्रकटीकरण, पुरावा जमा करणे व राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून न्यायालयात अपराध सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 'आयजीं'च्या चमूकडे जबाबदारीगठित केलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर) असून, त्यांच्या चमूकडे सीसीटीएनएसने जमा केलेला ह्यडाटाह्ण लक्षात घेऊन अँप्लिकेशन्स विकसित करण्याची जबाबदारी आहे. यासाठी हार्डवेअर, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे व अप्लिकेशन्सची चाचणी करण्याचे काम राज्य गुन्हे अभिलेख केंद्राकडे सोपवले आहेत.