शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

By admin | Updated: March 22, 2015 01:05 IST

तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे.

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूरतमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे. चित्रपटसृष्टीतील ६५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ५७ चित्रपट दिग्दर्शित केले. संकलण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, प्रसंगी तोंडाला रंग फासून ते मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन किंवा निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला.मराठी चित्रपटांच्या पडत्या काळात माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट बनविला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला. अजूनही हा विक्रम मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. माने यांनी मायभूमी कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती केली. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही येथील घेण्याचा अट्टहास धरला. आज जे काही कलावंत त्यांच्यामुळे शिखरावर आहेत, त्यांनाही माने यांचा विसर पडला आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. मात्र आजची परिस्थिती पालटली आहे. मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे आता सरकार दरबारी वाटत नाही. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. त्यांच्या नावाने येथे एखादे सभागृहही नाही. कोल्हापुरातील एका रस्त्याला आणि चौकाला महानगरपालिकेने त्यांचे नाव दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो. माने यांनी तमाशाप्रधान चित्रपटांबरोबरच ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशयाचे लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. राज्य सरकार त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, एवढीच समाधानाची बाब. माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा चित्रपटरसिक व्यक्त करीत आहेत.चित्रपट रसिकांची अपेक्षाच्कोल्हापूरच्या चित्रनगरीला ‘अनंत माने’ यांचे नाव द्यावे.च्अनंत माने यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवावा.च्शिवाजी विद्यापीठात चित्रपट अभ्यासकांसाठी स्वतंत्र दालन उभारून त्याला अनंत माने यांचे नाव द्यावे.फलकच गायबअनंत माने यांचे नाव लक्ष्मीपुरीतील एका चौकाला दिले होते. तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या नावाचा फलकच आता गायब झाला आहे.