राज ठाकरे : नाशिकमध्ये लोकप्रतिनिधी, पदाधिका:यांना आर्त साद
नाशिक : ते आले, त्यांनी पाहिले अन् ते गेले या नेहमीच्या चित्रला फाटा देत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नाशिक दौ:याची सुरुवात लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिका:यांची वैयक्तिक भेट घेऊन व सविस्तर चर्चा केली.
विशेष म्हणजे सगळ्यांचे म्हणणो ऐकून घेत भविष्यातील पक्ष बांधणीची वाटचाल निश्चित करण्याबाबत धोरण ठरविण्याच्या दिशेने त्यांनी पावले उचलल्याचे चित्र होते. जोरदार शक्तिप्रदर्शनाने स्वागत झाल्यामुळे राज ठाकरे यांनी अजूनही पक्षावर आपलीच पकड असल्याचे गुरुवारी दाखवून दिले होते. शुक्रवारी सकाळीही त्यांनी मनसेचे पक्ष कार्यालय राजगड येथे येऊन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक व पक्ष पदाधिका:यांची समोरासमोर चर्चा केली.
भविष्यात काय करता येईल, पक्ष संघटन मजबुतीसाठी काय केले पाहिजे, तुम्ही लोकांना भेटता काय, तुमच्या भागात वेगळा काय प्रकल्प तुम्ही राबवू शकता, महापालिकेतील सत्तेचा वापर करून भविष्यात पक्ष संघटन कसे बळकट करता येईल यावरच प्रामुख्याने त्यांनी भर दिल्याचे समजते. (प्रतिनिधी)
एकहाती सत्तेचा फटका
विधानसभेत पराभव कशामुळे झाला याचे कारण राज यांनी विचारले असता, काहींनी महापालिकेतील सत्ता कशी एकहाती होती. त्यामुळे कसे नुकसान झाले, पक्षाची सत्ता एकाच व्यक्तीच्या हाती असल्याने त्याचा निवडणुकीत कसा फटका बसला याची माहिती त्यांना दिल्याचे समजते.