शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिला धोरणाला वनविभागाचा छेद

By admin | Updated: November 11, 2016 05:18 IST

शासनाने महिला सक्षमीकरण, आर्थिक बळकटीकरणाचे धोरण निश्चित केले असले तरी या धोरणाला वनविभागाने छेद दिला आहे.

गणेश वासनि, अमरावतीशासनाने महिला सक्षमीकरण, आर्थिक बळकटीकरणाचे धोरण निश्चित केले असले तरी या धोरणाला वनविभागाने छेद दिला आहे. वने आणि वृक्षाच्छादित क्षेत्रवेगाने वाढविण्याकरिता असलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमामध्ये महिला बचतगटांना डावलण्यात आले आहे.राष्ट्रीय वननीती, १९८८मधील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील वनांचे संरक्षण आणि विकासाकरिता स्थानिक ग्रामस्थांचा सहभागमिळावा, यासाठी १६ मार्च १९९२च्या शासन निर्णयाद्वारे संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला. यात राज्यात २०१० ते २०१५ या पाच वर्षांसाठी महिला बचतगटांच्या सहभागाची व्याप्ती वाढविण्यासाठी एककृती कार्यक्रम लागू झाला. तथापि वनविभागाने गत पाच वर्षांत महिला बचतगटांना या कामातून डावलले आहे. या कालावधीत झालेली विविध विकासकामे, उपक्रमात मर्जीतील कंत्राटदार, पुरवठादारांनाच वनाधिकाऱ्यांनी सहभागी करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला. या मोहिमेसाठी लागणारी रोपटी बचतगटांच्या महिलांकडून तयार करून घेतली असती तर शेकडो महिलांना रोजगाराचे दालन उपलब्ध झाले असते.परंतु वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांना चुकीची माहिती पुरवून दोन कोटी वृक्ष लागवडीपासूनही बचतगटांच्या महिलांना दूरच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.