शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या शूटरने केले ७० रानडुक्कर ठार

By admin | Updated: January 11, 2016 02:42 IST

मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी-धाबा वनक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या ७० रानडुकरांना वन विभागाच्या शूटरने ठार केले

सुरेश रंगारी , कोठारी (चंद्रपूर) मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी-धाबा वनक्षेत्रातील शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या ७० रानडुकरांना वन विभागाच्या शूटरने ठार केले. गेल्या चार दिवसांत अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. वन विभागाच्या या कारवाईबद्दल वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जंगलाजवळच्या गावांमध्ये रानडुकरांकडून शेतपिकाची प्रचंड नुकसान केले जाते. याची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याचे वनविभागाने मान्य केले होते. तसेच घुमाकूळ घालणाऱ्या रोही व रानडुकरांना शासनाच्या नियमाने मारण्याची परवानगीही वनविभागाने दिली होती. मात्र त्यांना मारण्याची प्रक्रिया किचकट असल्याने शेतकऱ्यांना ते शक्य नव्हते. त्यामुळे वन विभागानेच या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. वन्यप्रेमीत संताप : शेतकऱ्यांना होणारा रानडुकरांचा त्रास थांबविण्यासाठी शासनाने शेतशिवार संरक्षण कुंपण योजना सुरू केली. मात्र ही उपाययोजना फसली. निरपराध रानडुकरांची हत्या करण्याचा अधिकार वन विभागाला नाही. हा प्रकार संताप आणणारा असून त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी वन्यप्रेमी धीरज बांबोडे यांनी केली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे व त्यांच्या मार्गदर्शनात कोठारी व धाबा क्षेत्रात ७० रानडुकरांना शूट करण्यात आले असून यापुढेही ही कारवाई सुरू राहील. - जी.बी. हाके, वन अधिकारी, कोठारी वनपरिक्षेत्र