शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Updated: February 2, 2016 04:02 IST

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.

जितेंद्र कालेकर,  ठाणेरायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. वन विभागाची परवानगी न घेता अभयारण्याच्या परिसरात त्यांनी घुसखोरी कशी केली, असा सवाल या परिसराला भेट देणाऱ्या एटीएसच्या पथकाने केला आहे. ‘इसिस’मध्ये सामील होणाऱ्यांना बॉम्ब बनविण्याचे आणि ते हाताळण्याचे प्रशिक्षण कर्नाळा अभयारण्यात दिले जाणार होते. उत्तर प्रदेशात पकडलेला रिझवान अहमद याने या भागाची रेकी केली होती. मुंब्रा येथून अटक केलेला मुदब्बीर सध्या एनआयएच्या ताब्यात असून, त्याने व त्याच्या साथीदारांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, कर्नाळ्यातील त्याच परिसराला एटीएसच्या पथकाने सोमवारी भेट देऊन तेथील पाहणी केली. आता या ठिकाणच्या सुरक्षेतही अधिक वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वन विभागाने गाफील राहून बाहेरील व्यक्तींना अभयारण्याच्या परिसरात प्रवेश कसा दिला, याचा जाब त्यांना द्यावा लागणार आहे. मुदब्बीर व फरहान या दोघांच्या नातलगांची चौकशी करण्यामागे कुणालाही विनाकारण त्रास देणे, हा हेतू नाही. निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. फरहान शेखची आजी मेहरुन्निसा यांच्याकडे झालेल्या चौकशीत आणि घरझडतीत अधिकाऱ्यांना विशेष काही हाती लागले नाही. फरहानच्या कृत्याबद्दल मेहरुन्निसा यांनी पश्चात्ताप झाल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.