शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना लुटणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: July 13, 2017 01:37 IST

कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम लाटणाऱ्या संस्थांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम लाटणाऱ्या संस्थांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. नोटीस बजावूनही, दाद न देणाऱ्या एका संस्थेविरोधात महापालिकेने भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या संस्था कामगारांचा पीएफ भरत नसल्याचा मुद्दा स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी बैठकीत उपस्थित केला होता. कामगारांचे पैसे न भरणाऱ्यांवर फौजदारी दाखल केली जाईल, असे बैठकीत सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाने माहिती मागविल्यानंतर सुरुवातीला काही संस्था ही रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार नोटिसाही दिल्या होत्या. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत कंत्राटी कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या संस्थांवर काय कारवाई केली? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. महापालिकेने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार १२ कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम ठेकेदार संस्थेला दिली. महापालिकेने दिलेली रक्कम आणि कामगारांची नियमानुसार ठेकेदाराने भरावयाची रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे संस्थेने जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, संस्थेने ही रक्कम जमा न करता बँकेचे खोटे शिक्के मारून पीएफची रक्कम भरल्याचे भासविले.क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी देव स्वयंरोजगार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सदस्यांना दिली. महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यलायच्या हद्दीतील रस्ते आणि गटर साफसफाईचे काम खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यासाठी २०१५ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये पात्र ठरलेल्या देव स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला हे काम मिळाले. या संस्थेने या कामासाठी १२ कंत्राटी कामगार पुरवावेत, असे आदेश महापालिकेने दिले.