शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराच्या पंढरीतही वारसदारच फडकरी!

By admin | Updated: February 7, 2017 23:44 IST

सहकाराची पंढरी अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी दुसरी पिढी जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरविली आहे़

सुधीर लंके, अहमदनगरसहकाराची पंढरी अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी दुसरी पिढी जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरविली आहे़विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे काँग्रेसकडून, शेवगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र घुले यांचे चिरंजीव डॉ़ क्षितिज घुले, तर चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे़ नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी आशा या भाजपाकडून उमेदवारी करीत आहेत. तर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता या आघाडीकडून नेवाशातून निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती या पाथर्डीतून तर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या कन्या तेजश्री लंघे नेवासा तालुक्यातून निवडणूक लढवित आहेत़ संगमनेरमध्ये थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांचे चिंरजीव मिलिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची सून वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, भाजपाचे माजी आमदार राजीव राजळे यांचे बंधू राहुल, नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे पुतणे प्रताप शेळके निवडणूक मैदानात आहेत़ सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची सून वंदना लोखंडे जामखेडमधून उमेदवारी करीत आहे़ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्या सूनबाई सुवर्णा सचिन जगताप श्रीगोंद्यातून उमेदवारी करीत आहेत. पारनेरमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या पत्नी सुप्रिया तर चिरंजीव सुजीत हे निवडणूक लढवित आहेत. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या मातोश्री अनुराधा, तर माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या सूनबाई अनुराधा निवडणूक रिंगणात आहेत.