शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीत भाविकांची मांदियाळी

By admin | Updated: July 3, 2017 04:44 IST

आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी सात लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले

प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : आषाढी एकादशीचा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी सात लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत आली असून, दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून अधिक वेळ लागत आहे.वारकरी संप्रदायातील कुंभमेळा म्हणून आषाढी यात्रेकडे पाहिले जाते. यात्रेतील प्रमुख दिवस एकादशीचा उत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातून रेल्वे, एसटी, तसेच खासगी वाहनांमधून सात लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.रविवारी बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उभे रिंगण, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गोल रिंगण पार पडले़ संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालख्यांसह अन्य पालख्या वाखरी येथे मुक्कामी विसावल्या़ इकडे भाविकांच्या अलोट गर्दीमुळे पंढरीतील रस्ते, चौक फुलून गेले आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ ‘माउली माउली’ म्हणत, भाविक गर्दीतून वाट काढत पुढे-पुढे जात आहेत.श्री विठ्ठल-रुक्मिणी पददर्शन रांग संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून ते गोपाळपूरच्या पुढे गेली आहे़ त्यामुळे पदस्पर्श दर्शनासाठी तब्बल २२ तासांहून जास्त कालावधी लागतोय, असे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेले प्रकाश गाबणे (हिंगोली) या भाविकाने सांगितले़ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० मंत्री पंढरीत येत आहेत़ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे़ फडणवीस हे तिसऱ्यांदा महापूजेसाठी येत आहेत.दर्शनरांगेत मोफत चहा-पाणी पंढरीत दाखल झालेला वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शन रांगेत सहभागी होत आहे.दर्शन रांगेतील भाविकांना शुद्ध पाणी व चहाची मोफत व्यवस्था आहे, तसेच प्रथमोपचार केंद्रही २४ तास खुले असल्याची माहिती देण्यात आली.