शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी बजेरियात बनते भोजन

By admin | Updated: November 14, 2014 00:50 IST

अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) रेल्वेगाड्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भोजनाचे साहित्य जप्त केले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता बजेरिया येथील एका छोट्या खोलीत भोजनाचे पॅकिंग

एफडीएची कारवाई : अस्वच्छ ठिकाणी ‘पॅकिंग’नागपूर : अन्न व औषधी प्रशासन विभागाने (एफडीए) रेल्वेगाड्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भोजनाचे साहित्य जप्त केले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता बजेरिया येथील एका छोट्या खोलीत भोजनाचे पॅकिंग करताना ही कारवाई केली आहे.‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय घाणेरड्या वातावरणात भोजनाची पॅकिंग करण्यात येत होती. या निकृष्ट भोजनाचे काही नमुने ताब्यात घेऊन उर्वरित भोजन नष्ट करण्यात आले. तयार करण्यात आलेले भोजन रेल्वेगाड्यात विकण्यासाठी आणल्या जाणार होते. कुठलाच परवाना नसताना दूषित वातावरणात तयार होणाऱ्या या भोजनामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते. एफडीएने येथून १० किलो तांदूळ, ५ किलो तयार झालेली भाजी जप्त केली. ही कारवाई सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त एन. आर. वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. राऊत, किरण गेडाम यांनी केली. रेल्वेगाड्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्हेंडर्स भोजन विकतात. स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातून भोजन रेल्वेगाड्यात पोहोचविणे सोपे होते. लोकमतने नुकतेच अवैध व्हेंडर्सबाबत वृत्त प्रकाशित केले होते. रेल्वे परिसर आणि रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरवर अंकुश ठेवणे रेल्वे सुरक्षा दलाची जबाबदारी आहे. परंतु तरीसुद्धा अवैध व्हेंडर्स रेल्वेगाड्यात भोजन पोहोचवीत असल्याची स्थिती आहे. रेल्वे स्थानकाजवळ मोतिबागमध्ये रेल्वेलाईनला लागून अतिक्रमण झालेल्या परिसरात सडलेली संत्री प्लास्टिक बॅगमध्ये टाकून स्वस्त दरात विकण्यात येत आहेत. यातील बहुतांश संत्री फेकण्याच्या स्थितीतील असतात. काही महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफॉर्मच्या अखेरीस एका रेल्वेच्या आलमारीतून सोनपापडी जप्त करण्यात आली होती. याशिवाय रेल्वेस्थानक परिसरात खर्रा, सिगारेट, मेवा, दूषित पाण्याची विक्री होत असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)