शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

सवलतीच्या दराने शेतक-यांना अन्नधान्याचा पुरवठा!

By admin | Updated: August 10, 2015 01:01 IST

अंमलबजावणीसाठी तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार लागले कामाला.

साहेबराव राठोड / मंगरूळपीर (वाशिम) : राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यापृष्ठभूमीवर मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील गोरगरीब शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जारी केले होते. या आदेशाची आता अंमलबजावणी सुरू झाली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी लाभार्थींचा शोध घेत आहेत. राज्यातील अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी कुटुंबाला सार्वजनिक वितरण प्रणालीतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर स्वस्तातील अन्नधान्य देता येईल काय, यावर शासनस्तरावर मंथन होऊन, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गोरगरीब शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर अन्नधान्य पुरवठा करण्याचे आदेश शासनाने जारी करण्यात आले. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्हय़ातील शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्न धान्याचा पुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गावपातळीवर तलाठी व स्वस्त धान्य दुकानदार यांना जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांनी बैठक घेतली असून, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. एपीएल (केशरी) मधील लाभार्थींच्या यादीतील शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो, त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ या शेतकर्‍यांना दिला जाणार आहे. एपीएलमधील शेतकर्‍यांना तांदुळ प्रति किलो ३ रूपये व गहु २ रूपये प्रतिकिलो या दराने दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना सातबारा, कुटुंब प्रमुखाचे शेतीवर अवलंबून असल्याबाबतचे घोषणापत्र गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाने वाशिम जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांना सूचना दिल्या असून अल्पावधीत याची कारवाई पूर्ण केली जावी, असे स्पष्ट केले आहे.