शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

मॅगीविरोधात ‘फूड सेफ्टी’ जाणार सर्वोच्च न्यायालयात

By admin | Updated: November 18, 2015 03:10 IST

मॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या ‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने सर्वाेच्च

- अतुल कुलकर्णी, मुंबईमॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या ‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने सर्वाेच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मॅगीची न्यायालयीन लढाई संपलेली नाही.फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने अगदी सुरुवातीस म्हणजे ५ जून रोजी मॅगीवर बंदी आणली होती. तर लगेचच ६ जून रोजी राज्य सरकारने मॅगीवर बंदी आणली होती. या बंदीच्या विरोधात मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. सरकारने नैसर्गिक न्यायाचे तत्त्व अवलंबले नाही आणि सरकारने ज्या प्रयोगशाळेत मॅगी तपासण्यासाठी दिली होती त्या प्रयोगशाळांना नॅशनल बोर्ड आॅफ लॅबोरेटरी अ‍ॅक्रीडेशन यांची मान्यता नसल्याची निरीक्षणे नोंदवित उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवली होती. मात्र, खासगी प्रयोगशाळेतून मॅगीची तपासणी करून घेणे आणि त्याच्या आधारे मॅगी बाजारात आणणे योग्य नाही, असा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वाेच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने मध्यस्थी केली आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी दवाब आणल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.या विषयाची फाईल विधी व न्याय विभागाकडे व तेथून महाअभियोक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मंत्री बापट यांच्या कार्यालयातून दिली.परीक्षणात मॅगी उत्तीर्ण झाली असून ती खाण्यास योग्य आहे, असे सांगत मॅगीने बाजारात पुन्हा पदार्पण केले. मात्र फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांना आक्षेप घेतले.