शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

२२ मजुरांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 19:27 IST

जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 16 - जिगाव प्रकल्प येथे काम करणा-या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. बाधीत रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पावर परप्रांतीय मजुर कामासाठी आले आहेत. कामावरील मजुरांना दररोज मेसचे जेवण देण्यात येते. रविवारी सकाळी मजुरांनी जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ होणे. पोट दुखणे, अंग खाजवणे, ताप आदी त्रास सुरु झाले. सुमारे २२ मजुरांना एकाचवेळी त्रास सुरु झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सर्व मजुरांना स्थानिक सामान्य रुग्णालयात दुपारच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन त्यांना दाखल केले. रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दाखल करण्यात आलेल्या रुग्णामध्ये मो.एजाज.मो.आलेम (वय २८), राजेशसिंह रामराजन (वय १७), निलेश श्रीकामता प्रसाद (वय १२), महेश इमामसिंग मोहरे (वय २०), सोनू प्रल्हाद साकेत (वय २४), अताहुसैन (वय २२), हरिप्रसाद श्रीराम कसब (वय १९), बेलाम अहमद (वय २३), दिलशाद महमंद (वय २०), दादुसिंग दिलराजसिंग (वय २५), रामचंद्र रामरतन यादव (वय १९), अशोकपाल श्रीपाद (वय २३) सत्येंद्र लालूप्रसाद (वय २५), जितेंद्र राम (वय २०), दुलम बहरीया (वय २०), रामु मोहीम रामविलास (वय १८), महेंद्रसिंग बहादुरीया (वय २३), जलालुद्दीन रहेमोद्दीन (वय १८), कैसरअली नवाजोद्दीन (वय १९), हे सर्व रा.जि.सिंगरोली मध्यप्रदेश तर उदय सुरेश गुडपल्ली (वय २१) अजय आनजी नायडू (वय २२) रा.मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
 
बोअरचे पाणी पिल्यामुळे त्रासाची शक्यता-
जिगाव प्रकल्पावर चारशेच्या जवळपास मजुर कामावर आहेत. राज्यातील मजुराबरोबर येथे मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना जेवणासाठी मेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरमधील पाण्याचा वापर केल्या जातो. नवीन बोअरचे पाणी पिल्यामुळे पोटात त्रास वाढल्याचे  बाधीत रुग्णांनी सांगितले. मजुरांसाठी पिण्याचे पाणी बोअरमधून टँकरमध्ये तर टँकरमधून पाण्याच्या टाक्यात टाकले जाते. बोअरच्या पाण्याची योग्य फिल्टर न झाल्यामुळे मजुरांना त्रास वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर-
जेवण झाल्यानंतर अन्नातून विषबाधा तसेच बोअरचे पाणी पिल्याने मजुरांना त्रास वाढला. त्यांना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करुन उपचार सुरु केले आहेत. सर्व मजुरांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.