शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्यात घट, ऊसक्षेत्रात वाढ !

By admin | Updated: March 18, 2016 04:03 IST

भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे.

मुंबई : भीषण दुष्काळ, अकाली पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याच्या उत्पादनात यंदा २४.९ टक्के घट झाली असून कापूस, तेलबिया, फळांच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. मात्र, एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे सर्वाधिक पाणी लागणाऱ्या उसाचे क्षेत्र तब्बल १९ टक्क्यांनी वाढले आहे. राज्याच्या कृषी विकासाचा दर आगामी वर्षात २.७ टक्क्यांनी घसरेल, अशी चिंता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. २०१५-१६ च्या वार्षिक आर्थिक पाहणीचा अहवाल वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला. उद्योग क्षेत्राच्या मूल्यवृद्धीत ५.९ टक्के तर सेवा क्षेत्रात १०.८ टक्के वाढ झाली असताना कृषी व संलग्न क्षेत्राच्या स्थूल मूल्यवृद्धीत पुढील वर्षी २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. कृषी उत्पादन घटल्याने पडलेला खड्डा उद्योग, सेवा क्षेत्राने भरून काढल्याचे दिसते. राज्याचा विकास ५.८ टक्क्यांवरून ८ टक्के इतका झाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही विकासाचा दर वाढला हे सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे फलित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रातील मूल्यवृद्धीचा दर ५.९ टक्के इतका असल्याचे आर्थिक पाहणीत म्हटले आहे. तृणधान्ये व कडधान्यांच्या उत्पादनात अनुक्रमे १८.७ टक्के व ४७ टक्के घट झाली. कापूस व तेलबिया आणि फळभाज्यांचे उत्पादन अनुक्रमे ५९.५ टक्के, ५२.८ टक्के आणि १५ टक्के इतके घटले. सलग दुसऱ्या वर्षी राज्याचा कृषी दर कमालीचा घटला आहे.दूध व्यवसाय संकटातकृषी क्षेत्राशी निगडित दूध व्यवसायदेखील कमालीचा संकटात आल्याचे सर्वेक्षणावरून स्पष्ट होते. ४३ टक्के सहकारी दूध संस्था आणि ५१ टक्के दूध संघ तोट्यात आहेत. एकूण २४ टक्के सहकारी संस्था तोट्यात असून त्यातील २२ टक्के संस्था कृषी पतपुरवठा करणाऱ्या आहेत.