शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नियम पाळा अन सेल्फी काढा

By admin | Updated: April 20, 2016 02:00 IST

सेल्फीचा मोह तर सर्वांनाच होतो. त्याला केंद्रबिंदू ठेवून ठाणे शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे कौतुक करून त्याचा पोलिसांसोबत एक सेल्फी काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे

पंकज रोडेकर, ठाणेसेल्फीचा मोह तर सर्वांनाच होतो. त्याला केंद्रबिंदू ठेवून ठाणे शहर वाहतूक शाखेने नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे कौतुक करून त्याचा पोलिसांसोबत एक सेल्फी काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे कोणाला याचे नवल वाटण्याचे कारण नाही. याचे तुम्ही साक्षीदार होऊ शकतात. वाहतुकीचे नियम पाळा आणि पोलिसांसोबत सेल्फी काढा, असे म्हटले जात आहे.वाहतुकीचे नियमांचे पालन केल्याबद्दल कौतुकीची थाप म्हणून त्या चालकाला थँक्यू उद्गार लिहीलेले एक कार्डही दिले जाणार आहे. तसेच त्याचा क्लिक केलेला तो अनोखा क्षण पोलिसांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपसह फेसबुकवर ही झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहरात सद्यस्थिती वाहतुकीचे नियम अक्षरश धाब्यावर बसवले जातात. यामध्ये विना हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, सिग्नल तोडणे, मद्यप्राशन करून वाहन हाकणे अशाप्रकारचे नियमांची पायमल्ली होताना दिसते. त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी वारंवार कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे वाहतूक पोलीस आणि चालकांमध्ये नित्यनियमाने खटके उडताना दिसतात. एवढेच नाही खटक्यांचे पर्यवसान हाणामारीतही झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. याचदरम्यान, ठाणे शहर वाहतूक शाखेने हा अनोखा उपक्रम एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हाती घेतला आहे. यामध्ये ठाणे शहरात वाहन चालवताना नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकाला थँक्यू असे उद्गार काढून त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शहरातील कोपरी, ठाणेनगर, वागळे इस्टेट, नौपाडा, कापुरबावडी, कासावडवली आदी वाहतूक शाखेच्या उपशाखांमधील नाकानाक्यांवरील सिग्रलला वाहन थांबल्यावर मिळणार काही क्षणाच्या वेळेत, फोटो क्लिक करणे हे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे. तसेच तो फोटो वाहतूक पोलिसांच्या सोशल मिडीयावर अपलोड करुन नियम पाळणाऱ्यांची नवीन ओळख म्हणून यामाध्यमातून पुढे आणण्याचा वाहतूक शाखेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.