शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कलाध्यापकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू: संजयकाका पाटील

By admin | Updated: April 23, 2017 00:26 IST

लवकरच बैठक : सांगलीत राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेस प्रारंभ

सांगली : शिक्षण क्षेत्रात कलाध्यापक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करून महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळातर्फे सांगलीच्या शांतिनिकेतन महाविद्यालयात शनिवारी ३८ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी खासदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, कलेचा आणि माझा फारसा कधी संबंध आला नाही. तरीही कलाकारांबद्दल आणि विशेषत: कलाध्यापकांबद्दल मला आदर वाटतो. शिक्षणक्षेत्रात त्यांचे योगदान आणि भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. सर्वच मागण्या मान्य होणार नाहीत, मात्र ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी लवकरच चर्चा करून कलाध्यापकांच्या प्रश्नावर बैठक बोलावण्यात येईल. आ. सुधीर गाडगीळ म्हणाले की, कला, क्रीडाचे शिक्षक शाळांमध्ये असायलाच हवेत. सांगलीला चित्रकारांची मोठी परंपरा आहे. पंत जांभळीकर, कल्याण शेटे यांच्यासारखे प्रसिद्ध चित्रकार सांगलीत घडले. कला आणि सांगली यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. येथील कलाक्षेत्र अधिक व्यापक आहे. त्यामुळे कलाध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहे. माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले की, चित्रकला विषय अत्यंत महत्त्वाचा असतानाही त्याकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष झाले आहे. दहावीच्या परीक्षेला चित्रकलेचा शंभर गुणांचा पेपर असावा, अशी प्रमुख मागणी शासनदरबारी करणार आहोत. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी यांनी स्वागत, तर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील, प्राचार्य बाळासाहेब पाटील, अ‍ॅनिमेटर भीमाशंकर शेंडगे, सौ. समिता पाटील उपस्थित होते. दादा भगाटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) शेंडगे यांना "जीवनगौरव"भारत सरकारच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजनचे अ‍ॅनिमेटर आणि माजी निर्माता भीमाशंकर शेंडगे यांना अधिवेशनात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे याचे स्वरूप होते. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका समिता पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. चित्रकला प्रात्यक्षिकाचा आनंदपरिषदेतील मोकळ््या वेळेत काही चित्रकारांनी व्यक्तिचित्रे रेखाटून उपस्थितांना कलाविश्वाची सफर घडविली. या चित्रांना उपस्थित रसिकांनीही दाद दिली. कोल्हापूर येथील सागर बगाडे यांनी नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.