शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

पोलिसांच्या घरांसाठी पाठपुरावा करणार- सतीश माथुर

By admin | Updated: August 29, 2016 23:44 IST

पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार

डिप्पी वांकाणी/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच कार्यभार स्वीकारला आहे. लोकमतच्या प्रतिनिधीनं या निमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. सतीश माथुर यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःची रोखठोक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, मला 2.5 लाख पोलिसांचं नियोजन करावं लागते. इसिसचं राज्यासमोर मोठं आव्हान असताना सायबर क्राइमही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पोलिसांना लवकरात लवकर घरं मिळावी, यासाठीही मी पाठपुरावा करणार आहे, असं पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी सांगितलं आहे.

पोलिसांची जनमानसात असलेली चुकीची प्रतिमा सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. अनेकदा सामान्य लोक एखादा गुन्हा झाल्यावरही पोलीस स्टेशनला जाणं टाळतात. मात्र पोलीस स्टेशन हे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी असतं, हे लोकांनी समजून घेण्याची गरज आहे. लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करणार आहे. सण, उत्सवात पोलीस सुट्ट्या न घेता ठरलेल्या कामांच्या तासांहून अधिक वेळ काम करतात. अनेक पोलिसांच्या त्या काळात सुट्ट्याही रद्द होतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलिसांच्या सातत्यानं सुट्ट्या रद्द होत आल्या आहेत. पोलीस खात्यात पोलिसांची संख्याही कमी आहे. पोलिसांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी पोलिसांसाठी असलेल्या गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचीही सरकारकडे मागणी करणार आहे.

सरकारनं पोलिसांना उदारमतवादीपणानं घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उदा. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांच्या घरांसाठी आलेल्या 500 अर्जांपैकी 250 अर्ज अर्थसंकल्पात पोलिसांसाठी असलेल्या निधीचा अभाव असल्यानं रद्द करण्यात आले होते. त्या धोरणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी प्रधानमंत्री गृह आवास योजनेसाठी पात्र असले पाहिजेत. त्याप्रमाणेच त्यांना दरवर्षी घरखरेदीसाठी 6 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं पाहिजे. याबाबत जागरूकता पसरवण्याची गरज असून, पोलिसांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देणं गरजेचं आहे.

आर्थिक आणि सायबर गुन्हे यात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे तपास करताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं गुन्हाचा छडा कशा प्रकारे लावता येईल, याचंही प्रशिक्षण पोलिसांना मिळावं, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पोलीस गुन्हेगाराला शोधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून चांगलं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे. पोलीस अतिशय जोखमीचं काम करत असून, सरकारच्या इतर खात्यांशीही समन्वय साधतात.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या उपद्रवही देशभरात वाढत आहे. मात्र ही नक्षलवादी प्रवृत्ती संपवण्याची गरज आहे. पोलीसही नक्षलवाद्यांशी लढताना अनेकदा जोखीम पत्करतात. सी-60 कमांडो आणि सीआरपीएफचे जवानांनी नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी अनेकदा ऑपरेशन राबवली आहेत आणि ती यशस्वी करून दाखवली आहेत. पवन हंस सारखे चॉपर आपल्याकडे आधीपासून उपलब्ध आहेत. तशाच प्रकारे आणखी हेलिकॉप्टर खरेदी करण्याची गरज आहे. इसिसच्या वाढत्या प्रभावावरही सतीश माथुर यांनी चिंता व्यक्त केली असून, दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.