शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठासाठी पाठपुरावा करू

By admin | Updated: May 17, 2015 00:57 IST

मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या वकिलांच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.

पुणे : मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या वकिलांच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. खंडपीठासाठी लागणारी जागा आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच पुण्यात व्हावे, यासाठी मंत्रिमंडळात शिफारस केल्याप्रकरणी शनिवारी पुणे बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालयातील अशोक हॉल येथे गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेरंब गानू, अ‍ॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, अ‍ॅड. सुहास फराडे या वेळी उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मिळावे म्हणून पुणे आणि कोल्हापूरकडून मागणी करण्यात येत होती. कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याचा ठराव मंत्रिमंडळात करण्यात आला. पुण्याला खंडपीठ मिळावे, यासाठी पाठपुरावा करणार असून, त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणार आहोत. पुणे जिल्हा न्यायालयातील प्रश्न आपल्याकडे मांडण्यात आले असून, ते मार्गी लावण्यासाठी लागेल ती मदत करू. शासकीय गोदामाची जागा देण्याची मागणी, न्यायालयाच्या इमारतीची देखभाल, ग्रंथालय या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे.’’न्यायालयातील लॉकअपची आपण पाहणी केली असून, न्यायालयात आणलेल्या आरोपींना त्यांचे कोणी नातेवाईक भेटणार नाहीत या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना करणार आहोत, असे बापट यांनी सांगितले. यावेळी सरकारी वकिलांनी ही आपल्या समस्यांचे निवदेन दिले.च्नवीन कायदे तयार करताना त्यावर चर्चा होते. आपल्याकडे नवीन कायदे तयार करताना त्याचे भविष्यातील दूरगामी परिणाम काय असतील, यावर चर्चा होत नाही. च्सर्वच राजकीय पक्षांतील लोक कायदे तयार करताना उदासीन असतात. या वेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर आणि अ‍ॅड. विजय सावंत यांनी खंडपीठाच्या मागणीसंदर्भात आपले व्यक्त केले.