शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाणी नाही... ऊसतोडच जगण्याचा आधार

By admin | Updated: December 11, 2015 23:48 IST

व्यथा ऊसतोड मजुरांच्या : जन्मत: पडते गाठ कोयत्याशी; मुले शिक्षणापासून वंचित

रवींद्र येसादे-- उत्तूर--दुष्काळानं होरपळून गेलेल्या विदर्भ, मराठवाडा येथील ऊस मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आॅक्टोबर महिन्यापासून आले आहेत. आपल्या गावात चारा नाही, पाणी नाही, ऊसतोडच आमच्या जगण्याचा आधार बनल्याची व्यथा ऊसतोड कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.उत्तूर, चिमणे, झुलपेवाडी, धामणे या परिसरात विदर्भ, मराठवाड्यातील ऊस मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यावर्षी पावसाचे अपुरे प्रमाण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हिरवाई पाहून आनंद होतो, तो केवळ कारखाने सुरू असेपर्यंतच. गावाकडे जाताना इथल्या मातीला विसरून गावाकडे सुन्न मनाने जावे लागते.केवळ घर उघडे असावे म्हणून वृद्ध तेवढेच गावात आहेत. बाकीचे लहान मुले, महिला तरुण वर्गाच्या हातात ‘कोयताच’ नशिबी आला आहे. ऊस तोडणीवेळी भटकंती असते तशीच ती लहान मुलांची असते. त्यामुळे शाळा शिकणं दुरापास्त होऊन बसलं आहे. नकळत सहा वर्षांचा चिमुरडा हातात कोयता घेतो, हे वास्तव आहे.टोळीवरच्या महिलांची अवस्था तर फार केविलवाणी आहे. गुजेरी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील टोळीतील महिला व्यथा मांडताना म्हणाल्या, स्त्रियांना पहाटे चार वाजता उठावे लागते. सहा वाजेपर्यंत जेवण आटोपून फडात जावे लागते.लेकरांना पहाटेची झोप मिळत नाही. सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन जावे लागते. कधी झाडाच्या फांदीला पाळणा, तर कधी फडात, ट्रकच्या सावलीत निपचित पडावे लागते. रात्रीच्या वेळेस आईला सोडून बोचऱ्या थंडीत विव्हळत पडावे लागते. बिचाऱ्या बाळाला काही कळत नाही. माय मात्र डोकीवर मोळी घेत छकुल्याकडे पहात शेकोटीची बाळाला ऊब देत पावलं टाकीत असते. रात्रीत ऊस भरण्यासाठी वाहन केव्हा येईल याची खात्री नसते. या साऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. पहाट कधी होईल याकडेच लक्ष द्यावे लागते. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा सामना करावा लागतो.शिक्षण अपूर्णच--जून ते आॅक्टोबरपर्यंतच मुलं शाळेत जातात. त्यानंतर मुल आई-वडिलांसमवेत फडामध्ये येतात. वारंवार कारखान्याकडून होणाऱ्या बदल्या, टोळीचे ठिकाण, कामाचे ठिकाण यामुळे मुलांच्या शाळेचा मेळ बसत नाही. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अपुरेच राहते.पाच रुपयास एक घागर लातूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासाठी पाचरुपयास एक घागर पाणी मिळते. तुमच्याकडे पाणी, चारा मुबलक आहे. आमच्याकडे ऊस तोडून जनावरांना घालावा लागतो, अशी केविलवाणी प्रतिक्रिया महिला व्यक्त करतात.