शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सेंद्रिय शेती करण्यावर भर

By admin | Updated: July 2, 2016 03:24 IST

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे.

अलिबाग : सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी सुरुवातीला एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात त्यामध्ये वाढ करून संपूर्ण जिल्हा सेंद्रियमय करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी दिली.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेतर्फे ३४ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सपत्निक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी म्हात्रे बोलत होते.सिक्कीम राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा नेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय खताच्या माध्यमातून शेती करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हळद लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी ६०० हेक्टरवर हळदीचे पीक घेण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.रायगड किल्ल्यावर जिल्हा परिषदेच्या जागेवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी तेथे गार्डन उभारण्यात येणार आहे. यासाठी पंचायत समितीकडे सुमारे सहा लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाऊस समाधानकारक सुरू झाल्याने जिल्ह्यात शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. यावेळी साप, विंचूदंश वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी साप, विंचूदंशावरील लसीचा पुरेसा साठा दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेळीपालन व्यवसायातून मोठ्या संख्येने उत्पन्न प्राप्त होते. तसेच अनुदानही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.