शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणार

By admin | Updated: November 26, 2014 02:02 IST

रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाहीत.

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती समारोह
यवतमाळ : रोजगाराभिमुख शिक्षणाअभावी राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील उद्योगांना अनुकूल असे प्रशिक्षित युवक मिळत नाहीत. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्यात रोजगाराभिमुख शिक्षणावर अधिक लक्ष देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ येथील प्रेरणास्थळावर आयोजित ‘व्हिजन महाराष्ट्र’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा होते. प्रमुख पाहुणो म्हणून 
माजी शालेय शिक्षणमंत्री तथा लोकमतचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा होते. 
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 1क् 
कोटी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय 
घेतला आहे. महाराष्ट्रातील एक कोटी युवकांना एखाद्या विशेष 
कौशल्याचे प्रशिक्षण देऊन बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच राज्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून तिला व्यावसायिक आणि कला 
क्षेत्रत जागतिक दर्जाची बनविणो आवश्यक आहे. त्यासाठी अध्ययन केले जाईल़
 
विकासाची प्रेरणा घेऊन चाललो
बाबूजी तसेच माङो वडील गंगाधर फडणवीस यांच्यात घनिष्ट मैत्री होती. त्यांच्यात अनेकदा विकासाच्या चर्चा रंगायच्या. वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूजींनी मला अपार प्रेम दिले. मी  ‘लोकमत’मध्ये जायचो, तेव्हा ते मला बोलवून घेत आणि अनेक विषयांवर चर्चा करीत. त्यांच्याकडून पित्याप्रमाणो प्रेमाचा वर्षाव होई. बाबूजींसोबत माङोही भावबंध जुळले. ‘प्रेरणास्थळ’ या बाबूजींच्या समाधी स्थळावरून मी तळागाळार्पयत विकास पोहोचविण्याची प्रेरणा घेऊन जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
 
एका कारखान्यासाठी लागतात 76 परवानगी
राज्यात एक कारखाना उभारण्यासाठी उद्योजकांना 76 वेगवेगळ्या विभागांकडून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे ते येथे येण्यासाठी उत्सुक नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली़ सोबतच एक खिडकी योजना लागू करण्याचा विचार असल्याचे सांगून ते म्हणाले की, 1क्क् कोटींहून अधिक गुंतवणूक करणा:या उद्योजकांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल. त्यांच्याकरिता शासनाकडून नोडल अधिका:याची नेमणूक करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली़ 
 
पंचनाम्याची अट रद्द करणार 
19 हजार गावांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या गावांना मदतीसाठी वैयक्तिक पंचनाम्याची अट अडसर ठरत आहे. ही अट शिथिल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्रही याबाबत सकारात्मक असून, केवळ तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. त्यानंतर लगेच ही अट रद्द करण्याबाबतचे आदेश जारी केले जातील. याद्वारे शेतक:यांना थेट मदत देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
विजय दर्डा यांनी मांडल्या विदर्भाच्या समस्या
च्खासदार विजय दर्डा यांनी विदर्भ तसेच यवतमाळ जिलच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमक्ष मांडल्या. यवतमाळ जिलत शेतक:यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग यवतमाळ जिलत विकासातील मैलाचा दगड ठरू शकतो. सन 2क्क्8 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले होते आणि तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतरही मंदगतीने या प्रकल्पाचे काम सुरु आहे.
 
च्विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तर या रेल्वे मार्गाच्या कार्यास गती मिळू शकते, असे दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. याशिवाय रेल्वेउद्यान, यवतमाळच्या विमानतळाचा विस्तार, यवतमाळचे उद्योग,  मिहान, ऑटो हब आणि शेतक:यांच्या समस्याही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
 
विदर्भाला न्याय देण्याची संधी : विकासाचे लक्ष्य समोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी कधीही कोणता भेदभाव केलेला नाही. त्यांच्या पित्याकडून त्यांनी ही शिकवण आत्मसात केली आहे. यासाठी पत्नी अमृता यांनीही त्यांना शक्ती दिली आहे. विदर्भावर कायम अन्याय होत आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या रूपात युवा नेतृत्व लाभल्याने विदर्भाला एक संधी मिळाली आहे. देवेंद्र यांच्या नावातच शक्ती आहे. याचमुळे युवांची संपूर्ण भिस्त मुख्यमंत्र्यांवर आहे, असे विजय दर्डा म्हणाले.