शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

उड्डाणपुलाच्या खांबाला धोका

By admin | Updated: July 12, 2017 01:14 IST

सोलापूर रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरला (खांब) अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका निर्माण झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : सोलापूर रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरला (खांब) अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी गाडीतळावरील पुलालाही अशा प्रकारचा धोका होता. त्यावर पालिकेने रस्त्यावर पिलरच्या बाजूला दुभाजक टाकल्याने जास्त उंचीची वाहने पुलाच्या बाजूने जात नसल्याने पिलरला ती धडकत नाहीत. अशीच उपाययोजना या पुलांच्या पिलरच्या बचावासाठी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.जमिनीपासून पिलरची उंची कमी असल्याने अवजड वाहने धडक देतात. परिणामी, पुलाला सारखे हादरे बसत आहेत. गाडीतळावरील पुलाच्या पिलरला असाच धोका निर्माण झाला असता, पालिकेने त्या पिलरच्या खाली रस्त्यावर दुभाजक टाकले. त्यामुळे तेथून धडकणाऱ्या वाहनांना जाता येत नाही. तशीची व्यवस्था येथे करावी लागेल, तरच या पिलरचे होणारे नुकसान थांबेल. त्यामुळे अशी दुरुस्ती दुभाजक टाकून पालिकेने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.>पिलरचे गज बाहेरपुण्याकडून हडपसरकडे व मुंढवा रस्त्यावरून हडपसरकडे येणारी वाहने या पुलाच्या पिलरला धडक देतात. ज्या वाहनांची उंची जास्त आहे अशी अवजड वाहने पुलाच्या बाजूने जाताना पुलाच्या खाली असलेल्या आडव्या पिलरला धडकल्याने त्याचे सिमेंट निघून जात आहे. या पिलरमधील लोखंडी गज आता दिसू लागले आहेत.