शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरून पुन्हा कलगीतुरा

By admin | Updated: April 27, 2016 03:00 IST

मृणालताई गोरे यांचे नाव देण्याचे प्रथम पालिकेच्या गटनेत्यांच्या सभेत आणि नंतर पालिका सभागृहात मंजूर झाले.

मनोहर कुंभेजकर,

मुंबई-गोरेगावच्या नव्या उड्डाणपुलाला पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या मृणालताई गोरे यांचे नाव देण्याचे प्रथम पालिकेच्या गटनेत्यांच्या सभेत आणि नंतर पालिका सभागृहात मंजूर झाले. आता राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री आणि गोरेगाव विधानसभेच्या आमदार यांनी निमंत्रक म्हणून छापलेल्या कार्यक्रम पत्रिकेत या पुलाचे नाव राममंदिर (मृणाल गोरे) उड्डाणपूल असे छापले आहे. त्यामुळे या प्रकरणी अजूनही भाजपा-शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला असल्याचेच स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि पालिका आयुक्त यांच्या नावांचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हा कलगीतुरा कसा सोडवणार? याकडे गोरेगावकरांचे लक्ष लागले आहे. ‘लोकमत’ने सातत्याने या उड्डाणपुलाबाबत वृत्त दिले होते. ‘लोकमत’ने शुक्रवार (दि. ४ मार्च) च्या अंकात ‘भाजपा-शिवसेना वाद : सावित्री फुले की मृणाल गोरे? गोरेगावात उड्डाणपुलावरून जोरदार रस्सीखेच’ असे वृत्त दिले होते. या बातमीचे गोरेगावात जोरदार पडसाद उमटले. गोरेगाव, जोगेश्वरी आणि दिंडोशी विधानसभा मतदार संघात व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर ‘लोकमत’ची बातमी वेगाने व्हायरल झाली. या पुलाला मृणालताई गोरे यांचे नाव दिलेच पाहिजे, अशी जोरदार मागणी सोशल मीडियातूनही झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही हे प्रकरण चांगलेच उचलून धरले. या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू सुरुवातीपासूनच आक्रमक होते. प्रभू हे दिंडोशीचे आमदार असले, तरी गोरेगाव(पूर्वे)कडील उड्डाणपूल ते नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र. ४८मधून जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला मृणालताई गोरे यांचे नाव देण्याची मागणी, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) दीपक भूतकर यांच्याकडे गेल्या सप्टेंबरमध्येच केली होती.गेल्या ८ मार्च रोजी ‘महिला दिनी’ या उड्डाणपुलाला मृणालताई यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पी (दक्षिण) विभागाच्या माजी प्रभाग समिती अध्यक्षा प्रमिला शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावातील महिलावर्ग घरोघरी गेल्या. अनेक सेवाभावी संस्थाकडेही जाऊन त्यांनी सह्यांची मोहिम राबवली. या पुलाचे नामकरण मृणाल गोरे उड्डाणपूल अशी तमाम गोरेगांवकरांची लोकभावना असताना, या पुलाच्या नामकरणामुळे रंगलेल्या कलगीतुऱ्याने गोरेगावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.