शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

धडाडधूऽऽम... फुस्सऽऽ! -

By admin | Updated: October 27, 2016 23:19 IST

सांगली -कारण राजकारण--

बरोब्बर दिवाळीचा मुहूर्त साधून सांगलीत फटाके अन् बॉम्ब फुटू लागलेत, औट उडू लागलेत. कानठळ्या बसवणारे औट, सुतळी बॉम्ब, धडाऽऽड करत फुटणारे लक्ष्मी-चिमणी तोटे, एकापाठोपाठ एक पेटणाऱ्या फटाक्यांच्या माळा, लवंगी फटाके, भुईनळे, सण्णऽऽ करत कुठंही घुसणारे बाण-रॉकेट, भिरभिरणारं भुईचक्र ते अगदी इवल्याशा केपांपर्यंत सगळं पहायला-ऐकायला मिळतंय.बुधवारी दिलीपतात्यांनी भन्नाट औट उडवला. त्यांचा विधानपरिषदेचा बार फुसका निघाल्याची कुजबूज सुरू होती... पण त्यांच्या औटमुळे इस्लामपूरकर साहेबांच्याही कानठळ्या बसल्या असाव्यात. तात्यांचा उद्वेग (की वैफल्य?) चाळीस वर्षांनी बाहेर पडलाय. आमदारकीचं त्यांचं स्वप्न जुनंच आहे, अगदी त्यांचे साहेब आमदार होण्याआधीपासूनचं! पण साहेब राजकारणात आले अन् तात्यांचं स्वप्न विरलं. त्यामुळं अधूनमधून त्यांना आमदारकीची उबळ येते. ती आताही आली, पण साहेबांनी साधी दखलही घेतली नाही. साहेब एका क्षणात जवळच्यालाही ‘अदखलपात्र’ करतात. (हे खरं तात्यांचं दुखणं! दिलीपतात्यांनी दिनकरतात्यांना विचारावं, हवं तर!) राजकारणात निष्ठा, कर्तृत्व अन् चारित्र्य यांना किंमत नसून पैसाच श्रेष्ठ असल्याचा साक्षात्कार तात्यांना इतक्या वर्षांनी झालाय. साहेबांचं, त्यांच्या पक्षाचं अन् विधान परिषदेच्या निवडणुकीचं राजकारण जवळून पाहिलेल्या तात्यांना हे माहीतच नव्हतं म्हणे!!तात्यांनी राजकारणाच्या नावानं बोटं मोडली तरी रोख कुणाकडं आहे, हे वाळव्यातली पोरं-टोरंही सांगतील. खरं तर साहेबांनी काय दिलं नाही तात्यांना? राज्य वस्त्रोद्योग महासंघाचं अध्यक्षपद दिलं, इस्लामपूरची सूतगिरणी दिली, तिथलं वस्त्रोद्योग संकुल दिलं अन् आता जिल्हा बँकेच्या चाव्याही दिल्या... साहेबांनी इतकं देऊनही तात्यांनी औट उडवलाच. ‘रत्नपारखी’ साहेब लगेच ‘गाजरपारखी’ झाले का!! (असं इस्लामपुरातले ‘घड्याळ’वाले बोलताहेत.) तिकडं इस्लामपुरात निशिकांतदादांनीही ‘घड्याळ’ फेकून देत सुतळी बॉम्बचा बार काढला. त्याचाही झटका साहेबांना बसला असावा. कारण दादांनी थेट तिथल्या कारभाऱ्यांच्या खुर्चीखाली (की पालिकेतल्या बाकाखाली?) बॉम्ब लावला. साहेबांच्या फोडाफोडीच्या छंदाला मिळालेला हा धोबीपछाड! साहेबांचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी एकत्र आलेल्या मंडळींना निशिकांतदादांच्या रूपानं तगडा भिडू मिळालाय. स्वच्छ चारित्र्याचा, सुसंस्कृत, उद्योगी राजकारणी अशी दादांची इमेज. वर्षानुवर्षं पालिकेवर निरंकुश हुकूमत ठेवणाऱ्या कारभाऱ्यांना या बॉम्बचा दणका बसेल, की साहेबांच्या फिरवाफिरवीनंतर दादांचा पुढचा बार फुसका ठरेल? काही सांगता येत नाही. इस्लामपूरकर काहीही करू शकतात. एका रात्रीत पुडक्यांची पोती फिरतात अन् बघताबघता ‘जनमत’ बदलतं. खुद्द दिवंगत राजारामबापूंना या बदलत्या ‘जनमता’चा फटका बसला होता. (पवार पार्टीची किमया!) खरं तर निशिकांतदादांनीही इस्लामपूरकर साहेबांच्याच सावलीत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, शिक्षण संकुल वसवलं. आता ‘एमबीबीएस’ला परवानगी मिळालीय. या टप्प्यावर दादांनी साहेबांचं ‘घड्याळ’ फेकून दिलंय. का? तर साहेब आता सत्तेत नाहीत अन् इंजिनिअरिंग-मेडिकल कॉलेजवाल्यांच्या मुसक्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी आवळल्यानं त्यांच्याशी जुळवून घेणं शहाण्या संस्थाचालकांना क्रमप्राप्त ठरतं... (हेही इस्लामपुरातल्या ‘घड्याळ’वाल्यांचं म्हणणं हं!) इस्लामपुरातच बुधवारी स्वत:भोवती गरगर फिरणारी भुईचक्रंही दिसली. सत्ताधाऱ्यांविरोधात झाडून सगळे विरोधक एकत्र येत सण्णऽऽ करत घुसणारे बाण अन् रॉकेट सोडत असताना शिवसेना मात्र सवतासुभा मांडत भुईचक्रं लावत बसलीय. विरोधकांकडील फटाक्यांच्या माळा फुसक्या ठरवण्यासाठी साहेबांना फारसं काही करावं लागत नाही, याचा प्रत्यय ही भुईचक्रं देतात...विधानपरिषदेसाठी मोहनशेठ कदमांचा अर्ज भरायला सांगलीत आलेल्या पृथ्वीराजबाबा (देशमुख नव्हे चव्हाण!) अन् विखे-पाटलांनी काही चिमणी तोटे उडवले, पण त्यांचा आवाज काँग्रेस कमिटीपुरताच राहिला. कारण सगळे तोटे फक्त देवेंद्रांच्या विरोधातच होते! तसंही विधानपरिषदेच्या मतदारांचं लक्ष ‘लक्ष्मी’ तोट्यांकडंच आहे म्हणा. शेखर गोरेंनी ‘लक्ष्मी’ तोट्यांचे बॉक्स पाठवतो, असं परवा जाताना अनेकांच्या कानात सांगितलंय. ते बॉक्स लवकर आले तर तेवढीच दिवाळी बाहेर निघेल, या आशेवर आहेत बिच्चारे!जाता-जाता : विधान परिषदेसाठी मोहनशेठ यांचं नाव पुढं येताच महापालिकेत ‘बंडोबा’ छाप लवंगी फटाक्यांच्या माळा लागल्या... पण सगळ्या फुस्स! यांचे नेते कारखान्यावरून म्हणतात की, उमेदवारी जाहीर करताना आपल्याला कुण्णीच विचारलं नाही, मोहनशेठ यांचं नाव जाहीर केलं कुणी? कारखाना एरियात म्हणे काहीजण खेळण्यातल्या बंदुकांतून केपा उडवत आहेत. आवेश मात्र बॉम्ब लावत असल्याचा! सोनसळकर साहेबांची नजर आपल्यावर पडावी, साहेबांनी जरा जास्त ‘लक्ष’ द्यावं, यासाठी हा सगळा खटाटोप..!- श्रीनिवास नागे