शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्सवरील फोटोमुळे लुटारू जेरबंद

By admin | Updated: November 7, 2016 23:18 IST

चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली.

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 7 - मुंबई येथे नोकरीस असलेल्या आणि दिवाळीनिमित्त अकोल्यात आल्यानंतर वाग्दत्त वधूसोबत खरप परिसरातून जात असताना या परिसरातील रहिवासी असलेल्या चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणातील वाग्दत वर हा सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाला असता त्याला न्यू तापडीया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारुंचे छायाचित्र दिसले, तक्रारी सोबतच ही माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील एकाला अटक केली असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. कार्ला येथील रहिवासी विवेक वानखडे हे मुंबई येथे प्लंबिंग वर्क्सचे कामकाज करतात. त्यांचे अकोल्यातीलच एका मुलीसोबत साक्षगंध झाले असून दोन महिन्यांनी विवाह सोहळा आहे. वानखडे दिवाळीला अकोल्यात आल्यानंतर ते त्यांच्या वाग्दत्त वधूला घेऊन खरप परिसरातून जात असताना त्यांना खरप येथील रहिवासी संजय अवधूत इंगळे, राष्ट्रपाल व त्यांच्या दोन साथीदारांनी अडविले. त्यानंतर शस्त्र आणि पाइपचा धाक दाखवून विवेक वानखडे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर पर्स घेऊन त्यामधील १ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, नेट बँकिंगचे पासवर्ड आणि वाहन चालक परवाना काढून घेतला. यासोबतच त्यांना पाठीवर व चेहऱ्यावर मारहाण केली. लूटमार केल्यानंतर हे चोरटे फरार झाले. त्यानंतर वानखडे वानखडे हे सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाले असता त्यांना न्यू तापडीया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारुंचे छायाचित्र दिसले, या प्रकाराची माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील संजय इंगळे याला अटक केली, तर राष्ट्रपाल नामक लुटारुचा शोध सुरु केला आहे. वाढदीवस शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या फलकावर लुटारुंचे छायाचित्र लावलेले असल्याने या लुटमारीचा काही वेळातच पर्दाफाश झाला.