शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

शौचकुपात अडकलेला पाय आठ तासांनी मोकळा

By admin | Updated: December 11, 2015 23:50 IST

कोकण रेल्वेतील प्रकार : कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीमधील वृद्धेचे हाल, डब्याचा पत्रा कापला

रत्नागिरी : कोकणकन्या एक्सप्रेसच्या प्रसाधनगृहात एका महिलेचा पाय अडकल्याने निर्माण झालेल्या संकटावर तब्बल आठ तासांनंतर मात करण्यात कोकण रेल्वेला यश आले. रत्नागिरी स्थानकात रेल्वे आल्यानंतर प्रसाधनगृहातील शौचकुपीच्या चारही बाजूने पत्रा कापून या महिलेला प्लॅटफॉर्मवर आणले गेले. पायाला दुखापत होणार नाही, याची काळजी घेत कटरने पत्रा कापून महिलेचा पाय सुुखरुप बाहेर काढण्यात आला. रुबियाबी शेख (६८, घाटकोपर, मुंबई) असे या महिलेचे नाव असून, तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुबियाबी शेख ही महिला ठाणे ते करमाळी असा प्रवास करीत होती. खेडमध्ये रेल्वे आली असता प्रसाधनगृहात गेलेली ही वृध्द महिला घसरून पडली. त्यामुळे तिचा पाय प्रसाधनगृहाच्या पाईपमध्ये गेला आणि अडकला. त्यानंतर तिकीट तपासनीस, कोच अटेंडंट तसेच प्रवाशांनी तिला उचलून तिचा पाय बाहेर काढण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यानंतर तिच्याबरोबर प्रवास करीत असलेले पती कासम शेख यांनी रेल्वेकडे मदत मागितली. प्रशासनाने मदतीसाठी चक्र हलवली. सकाळी साडेसात वाजल्यानंतर रेल्वे रत्नागिरीत आली. रेल्वेचे विभागीय प्रबंधक बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्षात तिला वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी तसेच रत्नागिरी नगरपरिषद अग्नीशमन विभागाचे कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. महिलेचा पाय सुजल्याने प्रसाधनगृहाच्या पत्र्याच्या पाईपमध्ये अधिकच घट्ट बसला. परिणामी तिला उचलून बाहेर काढणे अशक्य होते. त्यामुळे कटरच्या सहाय्याने प्रसाधनगृहातील शौचकूूपाच्या चारही बाजूने पत्रा कापण्यात आला व त्यासह महिलेला प्लॅटफॉर्म क्रमांक २वर आणले गेले. पायात अडकलेला प्रसाधनगृहातील शौचकुपाचा पाईप कटरने कापायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. तसे केले तर महिला जखमी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाईपच्या आतून मेटल प्लेट टाकली. त्यावरून कटरने पाईप कापण्यात आला व महिलेचा पाय बाहेर काढण्यात आला. त्यावेळी दुपारचे साडेबारा वाजले होते. (प्रतिनिधी)ती बोगी रत्नागिरीतच...महिलेचा प्रसाधनगृहाच्या पाईपमध्ये अडकलेला पाय बाहेर काढण्याच्या कामाला वेळ लागणार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे कोकणकन्या एक्सप्रेसची एस १० ही बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. आतील प्रवाशांना दुसऱ्या बोगीत बसवण्यात आले. त्यानंतर कोकणकन्या मडगावकडे रवाना झाली. वृध्देच्या धीटाईला सलाम...एवढा भयावह प्रसंग असूून व जीवावर बेतलेले असतानाही प्रसाधनगृहात अडकलेली वृध्द महिला रुबियाबी मात्र धीराने सर्व स्थितीला सामोरी जात होती. प्रचंड संयम तिच्यात दिसून येत होता. या सर्वातून सहीसलामत सुटका होणार, याबाबतचा विश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती कुठेही डगमगली नाही. उलट पाईप कटरने कापणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती सहकार्य करीत होती. तिच्या धीटाईला कर्मचाऱ्यांनीही सलाम ठोकला.