शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत पात्रता निश्चित करा - मुख्यमंत्री

By admin | Updated: May 12, 2017 03:23 IST

जोगेश्वरी रेल्वेच्या हद्दीतील तोडण्यात आलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची दहा दिवसांमध्ये पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोगेश्वरी रेल्वेच्या हद्दीतील तोडण्यात आलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची दहा दिवसांमध्ये पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिले. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. इंदिरानगर झोपडपट्टीतील सुमारे १२० झोपड्या तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. झोपड्या रेल्वेच्या हद्दीत असल्या तरी, राज्य शासनाचे २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे धोरण आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या धोरणानुसार येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी वायकर यांनी केली. त्यानुसार, दहा दिवसांत इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पात्र तसेच अपात्र झोपडीधारकांची यादी तयार करून ती एमएमआरडीएला सादर करावी. यादी मिळाल्यावर एमएमआरडीएने चेंबूर माहुल येथील त्यांच्याकडील सदनिका तात्पुरत्या स्वरूपात इंदिरानगरच्या रहिवाशांना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.या वेळी आरे वसाहतीतील नागरी सुविधांच्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. आदिवासी तसेच बिगर आदिवासींच्या पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे तसेच झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.