शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बडतर्फीबद्दल पाच वर्षांचा पगार

By admin | Updated: August 21, 2016 01:10 IST

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने १६ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे सेवेतून बडतर्फ केलेल्या मनोहर रामरावजी राऊत या शाखा व्यवस्थापकास भरपाईपोटी पाच वर्षांच्या

मुंबई : अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेने १६ वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे सेवेतून बडतर्फ केलेल्या मनोहर रामरावजी राऊत या शाखा व्यवस्थापकास भरपाईपोटी पाच वर्षांच्या पूर्ण पगाराएवढी रक्कम ९ टक्के व्याजाने द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.नियत वयोमानानुसार राऊत ३० एप्रिल २०१३ रोजी सेवानिवृत्त व्हायचे होते. परंतु बँकेने त्यांना १३ वर्षे आधी म्हणजे २८ एप्रिल २००० पासून बेकायदेशीरपणे बडतर्फ केले होते. याबद्दल भरपाई म्हणून बँकेने राऊत यांना निवृत्त होईपर्यंतच्या पगारापोटी ३६.७५ लाख रुपये १२ टक्के व्याजाने द्यावेत, असा आदेश अपिली सहकार न्यायालयाने दिला होता. याविरुद्ध बँकेने केलेली रिट याचिका मंजूर करून न्या. ए. एस. चांदुरकर यांनी हा आदेश दिला. भरपाईपोटी बँकेने न्यायालयात जमा केलेली पाच लाखांची रक्कम काढून घेण्यास राऊत यांना मुभा दिली. तसेच बँकेने उर्वरित रक्कम तीन महिन्यांत अदा करावी, असेही निर्देश दिले गेले.पैशाचा अपहार केल्याच्या आरोपावरून बँकेने राऊतांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले. याच संदर्भात दाखल केलेल्या फौजदारी खटल्यातून राऊत यांची कालांतराने निर्दोष मुक्तता झाली. या बडतर्फीविरुद्ध राऊत यांनी केलेल्या फिर्यादी आधी सहकार न्यायालयाने व नंतर अपिली सहकार न्यायालयाने फेटाळल्या. मात्र सन २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने राऊत यांच्या बाजूने निकाल देत त्यांची बडतर्फी बेकायदा ठरविली. मात्र तोपर्यंत राऊत यांचे निवृत्तीचे वय उलटून गेले होते. शिवाय शाखा व्यवस्थापक असल्याने ‘कामगार’ या वर्गात मोडत नाहीत, हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश न देता त्यांना बेकायदा बडतर्फीबद्दल बँकेविरुद्ध भरपाईसाठी दावा दाखल करण्याची मुभा दिली.यानुसार राऊत यांनी केलेला दावा मंजूर करून सहकार न्यायालयाने असा आदेश दिला की, राऊत यांना बेकायदेशीरपणे बडतर्फ केले गेले नसते तर ते आणखी १३ वर्षे नोकरी करू शकले असते. त्यामुळे त्यांना या बुडालेल्या सेवेचा सर्व पगार बँकेने भरपाई म्हणून द्यावा. हा आदेश अपिली सहकारी न्यायालयानेही कायम ठेवल्याने बँकेने उच्च न्यायालयात याचिका केली होती. (विशेष प्रतिनिधी)पूर्ण पगार का नाकारला?खालच्या दोन्ही न्यायालयांचा आदेश चुकीचा ठरविताना न्या. चांदुरकर यांनी म्हटले की, राऊत यांनी आधी उच्च न्यायालयात याचिका केली होती तेव्हा मागच्या संपूर्ण पगारासह पुन्हा कामावर घेण्याची त्यांची विनंती अमान्य करण्यात आली होती. अशा परिस्थितीत सहकार न्यायालयाने त्यांना शिल्लक राहिलेल्या सर्व १३ वर्षांच्या सेवेचा पूर्ण पगार भरपाई म्हणून देण्यात सांगणे म्हणजे उच्च न्यायालयाने जे प्रत्यक्षात नाकारले तेच अप्रत्यक्षपणे देण्यासारखे आहे.