शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चौदा हजार पूलांच्या दुरूस्तीसाठी पाच हजार कोटी : चंद्रकांत पाटील

By admin | Updated: February 27, 2017 22:19 IST

सावित्री नदीवरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर सरकारला जाग आली असून ब्रिटिशकालीन लहान मोठ्या अशा एकूण चौदा हजार पूलांच्या दुरूस्ती

नाशिक :  राज्यातील ब्रिटिशकालीन लहान मोठ्या अशा एकूण चौदा हजार पूलांच्या दुरूस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.

सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सदर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, महाडच्या दुर्घटनेनंतर सरकार हादरले. सरकारने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीमार्फत राज्यातील एकूण १४ हजार जुन्या पूलांच्या बांधकामाचे परिक्षण करुन घेत त्यांच्या सध्यस्थितीचा अहवाल प्राप्त केला आहे. जे पूल अत्यंत जीर्णावस्थेत आहे त्यांची तातडीने दुरूस्तीचे काम यानुसार पहिल्या टप्प्यात हाती घेतले जाणार असल्याचे पाटील म्हणाले. चालू वर्षासाठी पूलांच्या दुरूस्तीकरीता एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांमध्ये राज्यातील एकूण चौदा हजार पूलांची दुरूस्ती व बांधणी करण्यास सरकारला यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दुरूस्तीच्या कामासाठी विहित प्रक्रियेद्वारे संबंधित बांधकाम ठेकेदारांची निवड करावी जेणेकरून दुरूस्तीची कामे जलदगतीने पूर्ण होतील असेही त्यांनी सांगितले.इन्फो---महाड दुर्घटनेनंतर पूलांचा प्रश्न चव्हाट्यावररायगड जिल्ह्यातील सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची दुर्घटना महाड शहराजवळ आॅगस्ट महिन्यात घडली होती. या घटनेनंतर राज्यातील जुन्या पूलांच्या दुरूस्तीचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. मुख्यमंत्र्यांनी सर्व पुलांचे तातडीने बांधकाम परिक्षण करण्याचे आदेशही दिले होते.