शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील दोन डॉक्टरांसह पाच अटकेत

By admin | Updated: March 9, 2017 01:43 IST

म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना

सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याचे कर्नाटक कनेक्शन उघड करण्यात सांगली पोलिसांना यश आले. खिद्रापुरेसाठी गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या विजापूर व कागवाड येथील दोन डॉक्टरांसह पाचजणांना बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून प्रत्येकी दोन अशी चार सोनोग्राफी यंत्रेही जप्त केली आहेत.डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय ६४, रा. विजापूर), डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (६८, रा कागवाड, ता. अथणी), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक सौ. कांचन कुंतिनाथ रोजे (३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) व गर्भपातासाठी माधवनगर येथून औषधाचा पुरवठा करणाऱ्या सुनील काशिनाथ खेडकर (वय ३५, रा. माधवनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी घोडके, रोजे व साळुंखे या तिघांना न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. डॉ. खिद्रापुरेने विजापूर येथील डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर याच्याकडून काही रुग्णांची सोनोग्राफी करून घेतल्याचे तपासात समोर आले. बुधवारी पोलिसांनी देवगीकरच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)डॉ. घोडकेचे राजकीय कनेक्शनडॉ. घोडके भूलतज्ञ असून तो कागवाडमध्ये गेली ४० वर्षे रुग्णालय चालवत आहे. गेल्या पाच वर्षापासून त्याने सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग तपासणी सुरू केली होती. कागवाडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या डॉ. घोडके याच्यावर चार वर्षापूर्वी छापा टाकण्यात आला होता. मात्र, प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अटकेमुळे मिरजेत पोलिस ठाण्याच्या आवारात कागवाडमधील राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.संयुक्त समिती स्थापणार आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे भेट देऊन, डॉ. खिद्रापुरे याचे रुग्णालय आणि त्याने भ्रूण पुरलेल्या ठिकाणाची पाहणी केली. खासगी रूग्णालयांचे नियंत्रण करणाऱ्या मुंबई नर्सिंग कायद्यात सुधारणा करण्यात येईल, सीमाभागात महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नियुक्त करून अशा प्रकरणांना प्रतिबंध घालण्यात येईल असे सांगून याबाबत सभागृहात निवेदन करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.पत्नीची चौकशी, पुरलेले भ्रूण मुलींचेचडॉ. खिद्रापुरेला गर्भपातासाठी त्याच्या डॉक्टर पत्नीने मदत केल्याचा संशय असून, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण मुलींचे असल्याचा संशय असून, डीएनए तपासणीच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.