शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल्सचा ‘सिडको’ला विसर

By admin | Updated: March 27, 2017 03:56 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने २०१९ची डेडलाइन निर्धारित केली आहे. पण विमानतळ क्षेत्रात देश-विदेशातील

कमलाकर कांबळे /नवी मुंबईनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने २०१९ची डेडलाइन निर्धारित केली आहे. पण विमानतळ क्षेत्रात देश-विदेशातील प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेल्या पंचतारांकित हॉटेल्सचा सिडकोला विसर पडला आहे. विशेष म्हणजे, हॉटेल्ससाठी या क्षेत्रात अनेक भूखंड आरक्षित ठेवले असले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. विमानाचे टेकआॅफ होण्याअगोदर म्हणजे पुढील दोन-अडीच वर्षांत या परिसरात पंचतारांकित हॉटेल्स सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, आतापर्यंत सिडकोने हॉटेल्स उभारणीस एकाही कंपनीला निमंत्रण दिलेले नाही. सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गेल्या महिन्यात विमानतळ उभारणीची आर्थिक निविदा निश्चित करण्यात आली असून जीव्हीके कंपनीला विमानतळ उभारणीचा ठेका दिला आहे. प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून विमानतळ गाभा क्षेत्रातील दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रीनफिल्ड विमानतळ असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल. देश-विदेशातील प्रवासी येथून प्रवास करतील. त्यांच्या सुविधेसाठी, निवासासाठी येथे पंचतारांकित हॉटेल्स उभारणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी ३० ते ४० भूखंड आरक्षित ठेवले आहेत. पुढील दोन-अडीच वर्षांत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा ध्यास सिडकोने घेतला आहे. विमानाचे पहिले उड्डाण २०१९मध्येच होईल, यावर सिडको ठाम आहे. त्यानुसार आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर आतापासूनच पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांना आमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, त्या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. नियोजन गरजेचेनवी मुंबईत एक ते दोन पंचतारांकित हॉटेल्स आहेत. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर शहरात अशा हॉटेल्सची संख्या वाढणे आवश्यक आहे. विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचतारांकित हॉटेल्सचे आतापासूनच नियोजन होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज म्हणून या परिसरात पंचतारांकित हॉटेल्ससाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. लवकरच निविदा काढून हॉटेल्सच्या उभारणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको