शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या समुद्रात ‘पंचतारांकित’ अनुभव

By admin | Updated: March 11, 2017 01:45 IST

सी-प्लेन, चौपाट्यांचा विकास यांसह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता मुंबईतील समुद्रात जहाज असणारे पाच मजली तरंगते हॉटेल

मुंबई : सी-प्लेन, चौपाट्यांचा विकास यांसह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता मुंबईतील समुद्रात जहाज असणारे पाच मजली तरंगते हॉटेल पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन केले जाईल. मात्र हे हॉटेल पर्यटकांच्या सेवेत पुढील आठवड्यात येईल. जवळपास ५00पेक्षा अधिक पर्यटकांची क्षमता हॉटेलची आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसी, (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ), महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड हे मुंबईकर आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा एका खाजगी कंपनीच्या साहाय्याने देणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटन स्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. पर्यटकांसाठी सी-प्लेन सेवेचा आणि तीन चौपाट्यांचा टप्प्याटप्प्यात विकास करण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. याचबरोबर आता मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एका खासगी कंपनीच्या साहाय्याने आणले जात आहे. हे पंचतारांकित हॉटेल म्हणजे एक जहाज असून, ते पाच मजली आहे. तरंगणाऱ्या अशा पाच मजली हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी अनेक सोईसुविधा असतील. बँक्वेट (समारंभासाठी हॉल), रेस्टॉरंट, सभागृह असेल. अमेरिकेतील फ्लॉरिडा येथे बनलेल्या या तरंगणाऱ्या हॉटेलची एकूण किंमत ही ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मुंबईकर आणि खासकरून पर्यटकांसाठी हे हॉटेल दुपारी सुरू होऊन रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच त्याची वेळ पहाटे ३ वाजेपर्यंत करण्याचा विचार आहे. भुजबळांच्या हस्तेही झाले होते उद्घाटन२0१४ साली राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या तरंगते हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव उद्घाटनानंतर ते बंद झाले. आता या हॉटेलमध्ये बरेच बदल करून पुन्हा नव्याने सुरू केले जात आहे.