शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या नावाने पाच योजना जाहीर

By admin | Updated: January 23, 2016 04:05 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा लोकार्पण सोहळा २३ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या आगारात आयोजित केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. (प्रतिनिधी)एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या २१व्या वर्षी विवाहासाठी १ लाख रु पये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१६पासून पुढे जन्मास येणाऱ्या कन्यांच्या नावे एसटी महामंडळातर्फे १७ हजार ५०० इतकी रक्कम मुदत अथवा दामदुप्पट योजनेत एस.टी. बँकेत ठेवण्यात येईल.अपघात सहायतानिधी योजनाया योजनेअंतर्गत परिवहन महामंडळाच्या बस अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास १० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपये, अंशत: विकलांग झालेल्या व्यक्तीस २ लाख ५० हजार रुपये व तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तीस १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस लागणारा निधी निर्माण करण्यासाठी रा.प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सरसकट तिकिटावर १ रु पया नाममात्र अधिभार आकारण्यात येणार आहे. ‘१ रुपयात १० लाखांचा विमा’ असे योजनेचे स्वरूप असणार आहे.शिवशाही बस सेवा‘शिवशाही’ बस प्रकल्पाद्वारे सामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये ५०० वातानुकूलित बसेस सुरू केल्या जाणार असून, या बसेस एप्रिलपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वाढत्या खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या गाड्यांमध्ये आरामदायी आसने, वाचनासाठी दिवे, सी.सी.टी.व्ही., वाय-फाय, जीपीएस, मोबाइल व लॅपटॉप चार्जर्सची सोय असेल. आसनाला व शयनयानाला ९ इंची एलईडी स्क्र ीन असणार आहे. या बसेस मराठवाडा, विदर्भ, कोकणातील प्रवाशांना व राज्यातील सर्व प्रमुख शहरांना जोडतील अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.महिलांना ५ टक्के आरक्षित : राज्य नवीन रिक्षा परवान्यासाठी आॅनलाइन लॉटरीत महिलांना ५ टक्के आरक्षित करण्यात आले असून, महिलांकरिता ‘अबोली रंगाची रिक्षा’ सुनिश्चित करण्यात आली आहे.