शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

लाचखोरीची सव्वाशे कारणे होणार हद्दपार!

By admin | Updated: October 2, 2015 04:17 IST

सामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे.

यदु जोशी , मुंबईसामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे. ज्या कारणांसाठी वारंवार लाच द्यावी लागते अशी सव्वाशे कारणे त्यांनी शोधली असून, लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो. त्यातून ‘टेबलाखालून काही तरी द्यावेच लागते’ अशी समाजाची मानसिकता बनली आहे. सरकारी कार्यालयांच्या बाबतीत असलेली ही मानसिकता बदलण्यासाठी कामकाजाची नवी पद्धत विकसित केली जात आहे. लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक गोष्टी आॅनलाइन करणे, त्यातील कालापव्यय संपविणे, नियम काटेकोर करून पळवाटा बंद करणे, मानवी हस्तक्षेप संपविणे, अडवणूक करणाऱ्या घटकांना पायबंद घालणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधित सचिवांना पत्र पाठवून मुख्यमंत्री मते मागविणार असून त्यानंतर रुपरेषा निश्चित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यत्वे, गृह, महसूल, नगरविकास, शिक्षण या खात्यांबाबत लाचखोरीचे अधिकाधिक प्रकार घडतात,असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांनीही मुख्यत्वे याच खात्यांमधून लाचखोरी हद्दपार करण्यावर भर दिला आहे.1 नवीन नळ कनेक्शन घेणे, घरपट्टी जास्त न आकारण्यासाठी, बिगर शेती परवान्यासाठी, बांधकाम न पाडण्यासाठी2रेती वाहतूक, माती वाहतुकीची परवानगी, वीटभट्टी सुरू करण्याचा परवाना, रेशन दुकानावर कारवाई न टाळण्यासाठी, जमीन-घराचे खरेदीखत व इतर दस्त3विम्याची रक्कम मृताच्या वारसाच्या नावावर जमा करण्यासाठी, शिवारात लावलेल्या झाडांची नोंद घेण्यासाठी, विविध प्रकारच्या अनुदानांचा लाभ, हॉटेल खाद्य परवाना 4समन्सची माहिती देण्यासाठी, खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करणे, गुन्ह्याच्या तपासात पैसे उकळणे, दाखल गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी, लोकल ट्रेनमध्ये फेरीवाल्याचा धंदा करू देण्यासाठी 5पदोन्नतीचे प्रस्ताव शिफारस करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, घरकुलांचे बिल काढणे, मनरेगाची मोजमाप पुस्तिका नोंद, मोकळ्या जमिनीची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करणे, अंगणवाडी बांधकामाची चौकशी, नवीन घरांसाठी घरपट्टी सुरू करून एनओसी देणे, आंतरजातीय विवाहितांना शासकीय मदतीचा चेक देणे, कार्यालयीन बिले मंजूर करणे आणि मंजूर बिले अदा करणे, अतिक्रमणाला अभय, मूळ घरावर अधिकचे बांधकाम करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या देणे, शाळांमध्ये नवीन इयत्ता सुरू करण्याची परवानगी, शाळा सोडल्याचा दाखला देणे.