शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘पाच पसार आरोपींना पकडा, सुटी मिळवा’

By admin | Updated: March 4, 2017 05:23 IST

पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले.

मनीषा म्हात्रे,मुंबई- पालिका निवडणुकीच्या महिनाभर सुरू असलेल्या रणधुमाळीमुळे पोलिसांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी ताटकळत राहावे लागले. अशात बंदोबस्तानंतर थोडीशी उसंत मिळावी म्हणून सुटीची मागणी करणाऱ्या पोलिसांना ‘आधी पाच आरोपी पकडा, नंतर सुटी मिळवा’ अशा पोलीस उपायुक्तांच्या अजब फर्मानामुळे मुंबई पोलीस वैतागले आहेत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली. त्यात सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने आरोप-प्रत्यारोप वाढले. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी पोलिसांची सुटीही रद्द करण्यात आली होती. त्यात मुंबई पोलिसांनी तब्बल ३००० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मुंबईतील लढत प्रतिष्ठेची असल्याने येथील निवडणुकीवर सर्वांच्याच नजरा लागलेल्या. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र. त्यात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि सपाचे पाचही पक्षांचे बळ जास्त असल्याने येथील सुरक्षेच्या जबाबदारीमुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून बसावे लागत होते. त्यामुळे ८ तासांच्या ड्युटीऐवजी चक्क या वेळी पोलिसांना २४ तास कार्यरत राहावे लागले.स्थानिक पातळीवर वरिष्ठ निरीक्षकावर येथील जबाबदारीचा भार सर्वाधिक होता. अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यांच्या चोख नियोजनामुळे बंदोबस्त सुरळीत पार पडला. मुळात पोलीस ठाण्यातील खालच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकांच्या आदेशाने सुटीची परवानगी मिळते, तर वरिष्ठ निरीक्षकांना सुटीसाठी पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक असते. अशात बंदोबस्ताच्या ताणातून थोडी उसंत मिळावी म्हणून पोलिसांनी सुटीची मागणी केली. मात्र ‘आधी पाच पसार आरोपींना पकडा, त्यानंतर सुटी मागा,’ असे अजब फर्मान मुंबईच्या एका पोलीस उपायुक्ताने काढले आहे. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या ताणात भर पडली आहे. आरोपींना पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षकांनी खालच्या अधिकाऱ्यांच्या सुट्यांवर गदा आणल्याने येथील पोलीस वैतागले आहेत. >बळजबरीचा ताण अंगाशी येतोया प्रकरणी वरिष्ठ निरीक्षकाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, मुळात बंदोबस्तात चांगले काम केले म्हणून कौतुकाची थाप देण्याऐवजी सुटीवर गदा आणणे चुकीचे आहे. बंदोबस्तादरम्यान कुटुंबाला वेळ देणे शक्य झाले नाही त्यामुळे सुटी घेऊन त्यांच्यासोबत बाहेर जाण्याचे कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर आणखीन एका वरिष्ठ निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार, आधीच्याच ताणातून सुटका झाली नसताना हा बळजबरीचा ताण अंगाशी येत आहे. त्यामुळे ही एक प्रकारची छळवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे पोलिसांच्या ताणात भर पडत आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यात महिने उलटतात. त्यामुळे पुन्हा सुटीकडे दुर्लक्ष करत ही मंडळी आरोपींच्या शोधासाठी दिवसरात्र सापळे रचत असल्याचे काहीसे चित्र मुंबईत पाहावयास मिळते आहे.