वसई : महाडजवळ सावित्री नदीतील पुरात नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे आज सकाळपासूनच विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी नालासोपाऱ्यात धाव घेतली होती. मात्र, दुर्घटनेतील कुणीही याठिकाणी रहात नसल्याचे उजेडात आले. मात्र, बुडालेले कुटुंब नालासोपाऱ्यात पूर्वी वास्तव्याला होते, पण दोन वर्षांपूर्वी सर्वजण मुंबईत स्थलांतरीत झाली अशी माहिती त्यांच्या हाती आली. जयगड-मुंबई या बसमध्ये प्रवास करणाऱ्या स्रेहल आणि दिपाली या दोघी सख्ख्या बहिणी नालासोपाऱ्यातील दिप आंगनमध्ये सहाव्या मजल्यावर आपल्या चुलत भावाकडे रहायला होत्या. दोन वर्षांपूर्वी स्रेहलचे सुनील बैकर आणि दिपालीचे भूषण पाटकर यांचशी लग्न झाले होते. तेंव्हापासून त्या सांताक्रुझ आणि चर्नीरोड येथे वास्तव्याला होत्या. ही दोन्ही दांम्पत्य ११ वर्षीय चुलत भाऊ अनिषसह बसमधून प्रवास करीत होते. रात्री साडेअकराला ते या बसमध्ये रत्नागिरी-खंडाळा येथून बसले होते. त्यानंतर त्यांच्याशी अजूनही संपर्क झालेला नाही, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आली.>...सावित्री नदी पूल दुर्घटना
नालासोपाऱ्यातील पाच जण बेपत्ता झाल्याचे वृत्त निराधार
By admin | Updated: August 5, 2016 02:45 IST