शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

इमारत कोसळून भिवंडीत नऊ जण ठार

By admin | Updated: August 1, 2016 04:56 IST

भिवंडीच्या गैबीनगरमध्ये रविवारी दुपारी एक दुमजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला.

भिवंडी : भिवंडीच्या गैबीनगरमध्ये रविवारी दुपारी एक दुमजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यात चार मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चौघे एकाच कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे, ही इमारत अनधिकृत होती आणि महापालिकेने ती अतिधोकायदायक म्हणून जाहीर केली होती. मात्र मालक-भाडेकरूंच्या वादात घरे रिकामी न केल्याने रहिवाशांना प्राण गमवावे लागल्याचे समजते.ही इमारत २६ वर्षे जुनी होती. त्यात १४ कुटुंबे राहत होती; मात्र ती मोडकळीस आल्याने त्यातील सात कुटुंबे जागा सोडून अन्यत्र गेली होती. पालिकेने ती अतिधोकादायक जाहीर केली होती. मात्र, जागा आणि भरपाईच्या वादातून सात कुटुंबांनी घरे रिकामी केली नव्हती. या वादातून नागरिकांचा नाहक बळी गेल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. या इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग होता.रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे इमारत खचून ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या किंकाळ्या, मदतीसाठी आक्रोश सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याला सुरुवात केली. ढिगाऱ्याखालून संध्याकाळपर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात आले असून या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. तर, ढिगाऱ्याखाली अजून पाच जण अडकल्याची माहिती बचावलेल्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)>मृतांची नावे : आएशा मोमीन अन्सारी (५०), सय्यद खुर्शीद आलम अन्सारी (१७), खालीद खुर्शीद आलम अन्सारी (१६), शाकीम खुर्शीद आलम अन्सारी (१२), शहाजहाँ खुर्शीद आलम अन्सारी (४२), मुदस्सीर खुर्शीद आलम अन्सारी (२०), रोहेफ एजाज शाह (१०), सुफिया शाहनवाज शेख (१९) आणि अन्य एकाची ओळख पटलेली नाही.चिमुकले बचावले...इमारत कोसळल्यानंतर परिसरातील तरुणांनी इमारतीकडे धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. तेव्हा त्यांना लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी त्या दिशेचा अंदाज घेत ढिगारा दूर केला असता आठ महिन्यांचा अब्दुल रेहमान शानवाज मोमीन हा आढळला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याच परिस्थितीत नंतर जैद अन्सारी (सात महिने) हा देखील सापडला. त्यालाही फ्रॅक्चर आहे. या दोघांनाही उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे.