शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फॅंड्रीत काम करणा-यासह घरफोडी करणाऱ्या ५ जणांना अटक

By admin | Updated: June 27, 2016 20:13 IST

फॅंड्री तसेच प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा

ऑनलाइन लोकमत पुणे, दि.२७ -  फॅंड्री तसेच प्रतिज्ञा, प्रिझम या लघुपटात काम करणारा योगेश चौधरी याच्यासह पाच जणांना घरफोडीच्या गुन्ह्यात शहर गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़. त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचा ६१५ ग्रॅम वजनाचे सोने त्यामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने, १० तोळे वजनाची सोन्याची लगड, तसेच ४९६ ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू त्यामध्ये १३ नाणी, १३ चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, २ मनगटी घड्याळे, सोने वितळविण्यासाठी वापरलेली मशीन जप्त करण्यात आले़.योगेश बाबा चौधरी (वय १९, रा़ कासेवाडी), अमोल किसन अवचरे (वय १९, रा़ कासेवाडी), प्रतिक संजय वाघमारे (वय २०, रा़ शेवाळवाडी, हडपसर) तसेच चोरीचा माल विकत घेणारे बिपिन बाळकृष्ण कुलकर्णी (वय ३९, रा़ अमृतेश्वर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) आणि सराफ व्यवसायिक सागर अशोक शहाणे (वय २६, रा़ तुपेवस्ती, उरळी कांचन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याबाबत पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील यांनी सांगितले, की दत्तवाडी, स्वारगेट येथील घरफोडीच्या गुन्'ांचा समांतर तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कासेवाडी झोपडपट्टीतील काही मुले पिंपरी भागात सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आले होते़ त्याआधारे तपास करता अमोल अवचरे, योगेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी ८ ते १० दिवसांपूर्वी पर्वतीगाव येथील एका बंगल्यात घरफोडी केल्याची माहिती मिळाली़ योगेश चौधरी याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये सोन्याचे गंठण, आंगठी व सोन्याचे वाटीचा कापलेला पत्रा मिळाला़ त्यानंतर त्याने दोन अल्पवयीन मुलासह पर्वती गावातील एका बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली़ २७ मे ते १० जून दरम्यान चंदन बंगला बंद असताना बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करुन २३ लाख १८ हजार ५०० रुपयांचे १ किलो वजनाचे सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरुन नेल्याचे फिर्यादीने सांगितले़ ही माहिती मिळाल्यावर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले़ तसेच सोन्याचे दागिने विकण्यासाठी मध्यस्थी करणारा प्रतिक वाघमारे व चोरीचा माल विकत घेणारा बिपिन कुलकर्णी व सराफ सागर शहाणे यांना अटक केली़ आरोपी दुपारच्यावेळी पर्वती पायथा परिसरात फिरत असताना त्यांना बंगला बंद असल्याचे दिसले़ त्यांनी अ‍ॅक्सा ब्लेड खरेदी करुन रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला़ त्यांनी स्वारगेट भागातही घरफोडी केल्याचे उघड झाले आहे़ गुुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सी़ एच़ वाकडे, पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक नितीन भोयर, गणेश पाटील, अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक विलास पालांडे,कर्मचारी संजय गवारे, अमित गायकवाड, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, गणेश काळे, दिलीप लोंखडे, धर्मराज आवटे, प्रविण दळे, राजाराम काकडे, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, स्वप्निल शिंदे, प्रमोद हिरळकर व मोहनदास पाटील या पथकाने ही कामगिरी केली आहे़ पैशाच्या हव्यासापोटी योगेश चौधरी गुन्हेगारीकडेयोगेश चौधरी याने फॅंड्रीत शाळेमधील विद्यार्थ्याची छोटीशी भूमिका केली आहे़ फ्रेंड्रीत त्यांची अगोदर मुख्य भूमिकेसाठी आॅडिशन घेतली असल्याचे तो सांगतो़ याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा तसेच प्रिझम या लघुपटात काम केले आहे़ पण, अर्धवट शिक्षण, कासेवाडी झोपडपट्टीत बालगुन्हेगार असलेले अमोल अवचरे व इतरांची सोबत आणि पैशाच्या हव्यासापोटी तो यांच्याबरोबर गुन्ह्यामध्ये अडकला़